महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Breaking : ट्रक-बोलेरो धडकेत सोळांकुरचे तिघे तरुण जागीच ठार चौघे  तरुण गंभीर जखमी

10:38 AM Sep 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

निपाणी- राधानगरी रस्त्यावर सरवडेजवळ भीषण अपघात; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

Advertisement

 

Advertisement

सरवडे प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील सरवडे व मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाडीमध्ये झालेल्या भीषण अपघातात सोळांकूर ता राधानगरी येथील शुभम धावरे ,आकाश परीट व रोहन लोहार या तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर  ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली, संभाजी लोहार हे  तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ऐन गणेशोत्सवात तीन युवकांचा दूर्दैवी मृत्यू झाल्याने सोळांकूर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

राधानगरी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार बुधवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक (क्रमांक के ए २८एए८२०६ आणि बोलेरो गाडी (क्रमांक एम एच ४२एच३०६४) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार सर्वजण रा. सोळांकुर  हे जागीच ठार झाले, तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर फिर्यादी  राजेंद्र मनोहर लोहार ( रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार राधानगरी पोलीस ठाण्यात  गुन्हा  गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घेरडीकर, हवालदार अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता परंतु लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या दुर्घटनेमुळे राधानगरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

Advertisement
Next Article