कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Haddwadh: हद्दवाढीचे आदेश आयुक्तांना द्या, अन्यथा समितीकडून आंदोलनाचा इशारा

01:22 PM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

'महानगरपालिकेसमोर आत्मक्लेश आंदोलन करणार'

Advertisement

कोल्हापूर : राज्य शासन कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत संभ्रम निर्माण करत आहे. कोल्हापूर शहर हद्दवाढ करण्यासाठी राज्य शासनाने आयुक्तांना आदेश द्यावेत, अन्यथा गुरूवारी (दि.3 जुलै) महानगरपालिकेसमोर सकाळी दहा ते दुपारी 1 पर्यंत आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने दिला.

Advertisement

राज्य शासन कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका जाहीर करत आहेत. महानगरपालिका प्रशासन मात्र राज्य शासनाचे आदेश येत नाही तोपर्यंत हद्दवाढ करता येत नाही असे सांगत आहे. नेमके खरे कोणाचे शासनाच्या मनात नेमके काय आहे, एका आमदारासाठी हद्दवाढ का रोखली जात आहे, असा सवाल या बैठकीत मान्यवरांकडून उपस्थित केला.

पालकमंत्र्यांनी खुलासा करावाकृती समितीचे अध्यक्ष आर. के. पवार म्हणाले, हद्दवाढीबाबत राज्यशासनाची बैठक सकारात्मक झाली आहे. त्यानंतर हद्दवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हद्दवाढ होणार याबाबत कोल्हापूर शहरवासीय आनंदात असताना एक आमदार ती बैठकच अधिकृत नसल्याचे सांगत असतील तर याबाबत पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी खुलासा करावा.

मुलांच्यासह इच्छूक उमेदवारही आंदोलनात सहभागी होणार हद्दवाढीबाबत महानगरपालिकेला बुधवारी 2 जुलैपर्यंत राज्यशासनाचे पञ दिले नाही तर शहरवासीयांच्यावतीने मुलांच्यासह सर्व पक्षाचे इच्छूक उमेदवार गुरूवारी 3 जुलैला महानगरपालिकेसमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी सहभागी होतील, याची दक्षता राज्य शासनाने घ्यावी, असा इशारा अॅड. बाबा इंदूलकर यांनी दिला.

अनिल घाटगे म्हणाले, माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हद्दवाढीवर प्राधीकरणाची भूमिका मांडली. ती सुरळीत चालत नाही. आताचे पालकमंत्री हद्दवाढ काळाची गरज असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हद्दवाढीसाठी शासनाने अधिकृत पत्र देवून शहराचा विकास करावा.

राज्यशासनाने रितसर पत्र देउन महानगरपालिका प्रशासनाला हद्दवाढीच्या सुचना कराव्यात, हद्दवाढ झाल्याशिवाय येणाऱ्या निवडणूका जाहीर करू नये, असे मत प्रजासताकचे दिलीप देसाई यांनी व्यक्त केले. उपनगरातील नागरिकांचा हद्दवाढीला पाठिंबा उपनगरातील नागरिकांनी हद्दवाढीला पाठिंबा दिला असून तशी पत्रेही दिली आहेत, ती शासनाला सादर केली तर हद्दवाढीसाठी उपयोगी पडणार असल्याचे काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितले.

मनसेचे राजू जाधव म्हणाले, गावानी एकी दाखवत हद्दवाढीला विरोध दर्शविला. आपण शहरवासीयसुध्दा कोल्हापूर बंद पाळत एकत्र असल्याचे दाखवूया तरच हद्दवाढीचा विषय मार्गी लागणार आहे. अॅड. प्रमोद दाभाडे म्हणाले, हद्दवाढीबाबत सर्वांनी एकजूठ दाखवूया प्रसंगी त्रीव आंदोलनाची तयारी ठेवूया.

आपचे शहर महासचिव अभिजीत कांबळे यांनी हद्दवाढीमध्ये नाट्यामय घडामोडी घडत आहेत, याकडे शहरवासीयांनी बारकाईन लक्ष द्यावे. हद्दवाढ काळाजी गरज असल्याचे सर्वांना पटवून देणे गरजेचे आहे. प्रास्ताविक सुनिल देसाई यांनी केली.

पुढच्या टप्प्यात गावांना रोखूयाहद्दवाढीसाठी प्रसंगी शहरांच्या नाकावर वाहतूक रोखूया या शिवाय हद्दवाढीकडे लक्ष जाणार नसल्याचा आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संदिप देसाई यांनी दिला. यावर आर. के. पवार यांनी हा पुढचा टप्पा करता येईल असे सांगितले.

Advertisement
Tags :
@kolhapur#Kolhapur Muncipal Corporation#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaborder expansionhaddwadh kruti samitikolhapur haddwadh
Next Article