Kolhapur Big Breaking : ऊसदराचा तिढा वाढला! चौथी बैठक फिस्कटली; आंदोलन तीव्र करण्याचा राजू शेट्टींचा इशारा
आमच्या मागील हंगामातीन 400 रूपयांच्या मागणीच्या एक नव्हे तीन पाऊले मागे येऊन 100 देण्याची मागणी केली आहे. तरीही साखर कारखानदारांनी मागील हिशोब पूर्ण झाल्याने अधिकचे पैसे देता येणार नाही अशी भुमिका मांडली आहे. त्यामुळे आता काय व्हायचं ते होऊ द्या...उद्या 23 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटना चक्काजाम आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग रोखणारच अशी अशी ठाम भुमिका शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
पहा VIDEO >>> ऊसदराचा तिढा वाढला! चौथी बैठक फिस्कटली; आंदोलन तीव्र करण्याचा राजू शेट्टींचा इशारा
ऊस आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज चौथी बैठक पार पडली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेली बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सवर झाली.
आपली मागली हंगामातील 400 रूपये आणि यंदाच्या हंगामासाठी 3500 रूपयांच्या मागणीवर ठाम असलेल्या राजू शेट्टी यांनी थोडीशी नरमाईची भुमिका घेत मागील हंगामातील 400 रूपयापैकी 100 रूपयाचा हप्ता त्वरित देण्याची मागणी लावून धरली.
यावर कारखानदारांनी मागील वर्षीचा हिशोब पुर्ण झाला असून आता ती देता येणार नसल्याची भुमिका मांडून मागील हंगामातील काही देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. साखर कारखान दार आणि शेतकरी संघटनेच्या या विरोधाभासी भुमिकेमुळे आजची बैठक फिस्कटली असून स्वाभिमानीने ऊसदराचे आंदोलन अधिक तिव्र करणार असून उद्याचा आपला चक्काजाम आंदोलन होणारच असे जाहीर केले.