महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर बाजार समिती सभापती पदी प्रकाश देसाई; ‘जनसुराज्य’ला मिळाली सभापती पदाची संधी

06:42 PM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

राष्ट्रवादीच्या सोनाली पाटील उपसभापती; निवडीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अॅड प्रकाश पांडुरंग देसाई (बोरगाव-देसाईवाडी) यांची निवड झाली. उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोनाली शरद पाटील (अर्जुनवाड) यांची बिनविरोध निवड झाली. नूतन पदाधिकारी निवडीसाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाची सोमवारी विशेष सभा झाली. प्राधिकृत अधिकारी डॉ. प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. दोन्ही पदासाठी एकास एक अर्ज आल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि आतषबाजी करून जल्लोष केला. या सभापती, उपसभापतींना एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्यसह विविध पक्षांची संयुक्त आघाडी सत्तेत आहे. यापूर्वी काँग्रेसकडे बाजार समितीचे सभापती पद होते. आघाडीच्या सत्ता फॉर्म्युलानुसार दुसऱ्या वर्षी जनसुराज्य शक्ती पक्षाला सभापती पदाची संधी मिळणार होती. काँग्रेसचे भारत पाटील-भुयेकर यांनी सभापती पदाचा आणि शंकर पाटील यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला होता. नूतन पदाधिकारी निवडीसाठी बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये संचालकांची विशेष सभा झाली. सभापती पदासाठी देसाई यांचे नाव संचालक सूर्यकांत पाटील यांनी सुचविले. संचालक शेखर देसाई यांनी अनुमोदन दिले. उपसभापतिपदासाठी पाटील यांचे नाव संचालक पांडुरंग काशीद यांनी सुचवले. संचालक नानासो कांबळे यांनी अनुमोदन दिले. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी संचालक बाळासाहेब पाटील, मेघा देसाई, राजाराम चव्हाण, शिवाजीराव पाटील, संदीप वरंडेकर, सुयोग वाडकर, संभाजी पाटील, नंदकुमार वळंजू, शंकर पाटील, सचिव जयवंत पाटील उपस्थित होते. उपसभापती सोनाली पाटील या माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटाच्या आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सोबत घेऊन कामकाज करणार
बाजार समितीचे सभापती म्हणून कामकाज करत असताना शेतकऱ्यांसह सर्व घटकांना विश्वासात घेतले जाईल. बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील.

Advertisement

Advertisement
Next Article