Kolhapur News: गणेश मंडळाबरोबरच स्ट्रक्चर अन् DJ मालकांवरही गुन्हे दाखल
जुना राजवाडा पोलिसांनी 23 मंडळाच्या अध्यक्षासह 69 जणांवर गुन्हे दाखल
कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने बंदी घालूनही साऊंड सिस्टीमचा दणदणाट करत, पोलिसांनी केलेल्या सूचनाकडे दुर्लक्ष करत तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करत, मिरवणूक पाहायला आलेल्यांच्या जिविताला धोका उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा ठपका ठेवत जुना राजवाडा पोलिसांनी 23 मंडळाच्या अध्यक्षासह 69 जणांवर गुन्हे दाखल केलेत.
विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच पोलिसांनी स्ट्रक्चर मालकांच्यावरही गुन्हे दाखल केलेत. आगमन मिरवणुकीत मंडळांनी ओलांडलेली आवाजाची मर्यादा लक्षात घेऊन पोलिसांनी विर्सजनापूर्वीच शहरातील ध्वनियंत्रणा, लाईट्स, जनरेटर, क्रीन व्यावसायिक आणि गणेश मंडळांची बैठक घेतली होती. या बैठकीत साऊंड सिस्टीमच्या आवाजाचा दणदणाट, त्यासाठी प्रेशर मिड तंत्राचा वापर, लाईट्सचे मोठे स्ट्रक्चर चालणार नाही, असा इशारा दिला होता.
या आदेशात विर्सजन मिरवणुकीत लेसर, धूर फवारणी करणारे स्मोकर, कर्कश ध्वनी निर्माण करणारे प्रेशर मीड आणि आग ओकणाऱ्या यंत्रणांना बंदी घातली होती. त्याचबरोबर उभारण्यात येणारे स्ट्रक्चर 12 बाय 10 या आकारात असतील असे सांगितले होते.
या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 23 मंडळाचे अध्यक्ष, 17 डीजे मालक, 14 स्ट्रक्चर मालक तर अनोळखी 6 डीजे व 9 स्ट्रक्चर मालक असे 69 जणांवर भारतीय न्याय संहीता 2023 च्या कलम 223 व 285 नुसार शासकीय आदेशाचा भंग व सार्वजनीक ठिकाणी मिरवणूक पाहायला आलेल्यांच्या जिविताला धोका उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा ठपका ठेवत जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल :
1) तुषार पाटील, अध्यक्ष शहाजी तरुण मंडळ, रा. शहाजी वसाहत, डीजेमालक प्रथमेश बुचडे, रा. गडहिंग्लज, स्ट्रक्चरमालक ऋषिकेश माने.
2) अभिजित पाटील, अध्यक्ष, अवचित पीर तालीम मंडळ, डीजे मालक धनाजी चौगुले, स्ट्रक्चरमालक उदय चव्हाण
3) शिवराज नलवडे, अध्यक्ष संध्यामठ तरुण मंडळ, शिवाजी पेठ, डीजेमालक संदेश पाटील, रा. शिवाजी पेठ, स्ट्रक्चरमालक अक्षय
4) योगेश पावले, अध्यक्ष वेताळ तालीम, डीजेमालक सुमित पारगावकर, रा. म्हसवे, स्ट्रक्चरमालक ओंकार कन्हेरकर
5) अक्षय पिंजरे, अध्यक्ष हिंदवी स्पोर्टस क्लब, साकोली कॉर्नर, डीजेमालक व स्ट्रक्चरमालक सोमनाथ दिंडे, पुणे
6) दिलीप माने, अध्यक्ष रंकाळावेश तालीम गणेश उत्सव मंडळ, शिवाजी पेठ, डीजेमालक अनोळखी व स्ट्रक्चरमालक महादेव खापणे
7) अवधूत सावंत, अध्यक्ष कै. उमेश कांदेकर ग्रुप, रंकाळा टॉवर रा. रंकाळा टॉवर, डीजेमालक अशोक कांबळे, स्ट्रक्चर मालक शंभुराजे हजारे
8) फिरोज सय्यद, अध्यक्ष महाराष्ट्र सेवा मंडळ, रंकाळा रोड, डीजे मालक जाकी, स्ट्रक्चर मालक आकाश हावळ,
9) महेश पिंजरे अध्यक्ष शिवाजी तालीम मंडळ, डीजेमालक अनोळखी व स्ट्रक्चर मालक अनोळखी
10) मेघराज पवार, अध्यक्ष दिलबहार तालीम मंडळ, डीजेमालक अभी मांगलेकर, रा. यादवनगर, स्ट्रक्चरमालक हरीश ढवळे, इचलकरंजी
11) आकाश सांळोखे, अध्यक्ष बालगोपाल, डीजेमालक आजम सोलापुरे, स्ट्रक्चरमालक श्रीकांत तुंबेकर
12) अभिजित क्षीरसागर, अध्यक्ष प्रॅक्टिस क्लब मंगळवार पेठ, डीजेमालक अतिश भोसले स्ट्रक्चरमालक किरण भालकर
13) तानाजी गायकवाड, अध्यक्ष नंगीवली तालीम मंडळ, डीजेमालक सागर काळे, रा. अहिल्यानगर, स्ट्रक्चरमालक इंद्रजित ऐनापुरे, रा. फुलेवाडी
14) विजय जाधव, अध्यक्ष पाटाकडील तालीम मंडळ रा. उजळाईवाडी, डीजेमालक अविनाश कोरवी, रा. कोरोची स्ट्रक्चरमालक गणेश इंचनाळकर
15) सागर चावरे, अध्यक्ष धर्मराज तरुण मंडळ संभाजीनगर, डीजे मालक, स्ट्रक्चरमालक (अनोळखी)
16)अनिकेत लोखंडे, अध्यक्ष पीएम बॉईज, डीजेमालक व स्ट्रक्चरमालक. अनोळखी
17) रामदास काटकर, अध्यक्ष वाघाची तालीम मंडळ, डीजेमालक संतोष पवार, रा. पुलाची शिरोली, स्ट्रक्चरमालक मोहसीन मुल्ला
18) नामदेव लोहार, अध्यक्ष क्रांती बॉईज मंडळ, डीजेमालक पृथ्वीराज मंडलिक, कोल्हापूर. स्ट्रक्चरमालक अनोळखी
19) सूरज खराटे, अध्यक्ष बोर तालीम, लक्षतीर्थ वसाहत रा. लक्षतीर्थ वसाहत, डीजेमालक देवा पांढरे, रा. नवे पारगाव. स्ट्रक्चरमालक अनोळखी
20) संतोष कांदेकर, अध्यक्ष रंकाळा तालीम मंडळ डीजेमालक विनायक साळुंखे, स्ट्रक्चरमालक अनोळखी 21) प्रणव चौगुले, अध्यक्ष चक्रव्यूह तालीम मंडळ, साळुंखे पार्क, रा. साळुंखे पार्क, डीजेमालक नवनाथ इंगवले, रा. पुणे. स्ट्रक्चरमालक अनोळखी
22) ऋषिकेश बामणे, अध्यक्ष बालगणेश मित्र मंडळ, बीजीएम सुभाषनगर डीजेमालक सतीश देसाई, स्ट्रक्चरमालक अनोळखी
23)प्रतीक कोकणे, अध्यक्ष जवाहरनगर मित्रमंडळ, डीजेमालक व स्ट्रक्चरमालक अनोळखी.