चालत्या दुचाकीवरून पडल्याने कोलगावच्या तरुणाचा मृत्यू
सावंतवाडी -
अचानक फिट येऊन चालत्या दुचाकीवरून पडून दुचाकीस्वार किशोर मुकुंद मेजारी(२९) रा . कोलगाव- भोमवाडी ता , सावंतवाडी हा तरुण बेशुद्धावस्थेत रस्त्यावर कोसळला . तात्काळ त्याला तेथील नागरिकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . डॉक्टरांनी तपासून सदर तरुण मयत झाल्याचे घोषित केले .ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी बसस्टॅण्ड नजीक घडली . किशोर हा कामावरून आपल्या दुचाकीने जात असताना अचानक त्याला फिट आली आणि दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यावर कोसळला . रुग्णालयात पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली . किशोर याला फिट व ह्रदयविकाराचा त्रास होता .अपघाताबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे कोलगाव पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे . मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .