कोलगाव- झिरंगवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
नगरसेविका ॲड.सायली दुभाषी यांचे प्र. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी : प्रतिनिधी
शहरातील कोलगाव झिरंगवाडी भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून शाळकरी मुलांच्या सायकल मागून व पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हे श्वान धावून नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करून त्यांना आश्रय गृहांमध्ये बंदिस्त करावे अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका ॲड.सायली दुभाषी यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . सदर भटके कुत्रे इमारत व घराबाहेरील पार्क केलेल्या दुचाकी आदींचे नुकसान करीत आहेत. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे आदेश पारित केले आहेत . त्याप्रमाणे सावंतवाडी नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांना पकडून बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे .