कोलगाव केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धेत आंबेगाब शाळा नं.1 अव्वल
18 चषक व 22 मेडल्स सहित मिळविली कोलगाव केंद्राची चॅम्पियनशीप
ओटवणे| प्रतिनिधी
कोलगाव केंद्र स्तरिय शालेय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत आंबेगाव शाळा नं.-1 ने घवघवीत यश मिळवत कोलगाव केंद्राची जनरल चॅम्पियनशिप पटकावली.या शाळेच्या लहान गटाने समूहगीत-विजेतेपद, समूहनृत्य-उपविजेतेपद, लहान गट मुलगे- कबड्डी, खो-खो, रिले आणि मुलींनी कबड्डी, रिलेचे विजेतेपद तर खो-खो चे उपविजेतेपद पटकावले. कु. दीपराज झोरे-उंच उडी व लांबउडी-प्रथम, कु. गौरव गावडे-उंच उडी-द्वितीय,50 मी धावणे-तृतीय,कु. नितेश जाधव-लांब उडी-द्वितीय,100 मी* धावणे-तृतीय, कु. प्रणव तेली-50 मी धावणे-तृतीय क्रमांक, कु. लक्ष्मी परब-उंच उडी-प्रथम, लांब उडी-द्वितीय, कु. रुची शेळके-लांब उडी-प्रथम,100 मी धावणे-तृतीय, कु. लक्ष्मी वरक-100 मी धावणे-द्वितीय क्रमांक पटकावला .
मोठया गटाने समूहगीत-विजेतेपद, समूहनृत्य व ज्ञानी मी होणार-उपविजेतेपद मिळवले तसेच मोठा गट-मुलगे- खो-खो, कबड्डी, रिले-उपविजेते, मोठा गट मुली-कबड्डी, रिले-विजेतेपद, खो-खो-उपविजेते ,कु. भावार्थ झोरे-लांब उडी-प्रथम, उंच उडी-द्वितीय, कु. रोहन झोरे-गोळा फेक-द्वितीय, उंच उडी-तृतीय, कु. प्रवीण जंगले-100 मी धावणे-द्वितीय क्रमांक, कु. सिद्धी पाटील-उंच उडी व 100 मी धावणे-प्रथम, कु. सानिका कुंभार-गोळा फेक-प्रथम, लांब उडी-द्वितीय, कु. तन्वी पाटील-उंच उडी-द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रिडा शिक्षक नितीन सावंत, प्रदीपकुमार म्हाडगूत, रसिका नाईक, स्नेहल कांबळे, मुख्याध्यापिका श्रीम. मुननकर यांचे मार्गदर्शन लाभले. या शाळेच्या यशाबद्दल कोलगाव केंद्राचे केंद्र प्रमुख म. ल. देसाई, आंबेगाव सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी राऊळ, उपाध्यक्षा तेजस्वी गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मुननकर, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी सर्व मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.