For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कोळंब टेंबवाडीचा पाणीप्रश्न मार्गी; बोअरवेलमुळे ग्रामस्थांना दिलासा

01:14 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोळंब टेंबवाडीचा पाणीप्रश्न मार्गी  बोअरवेलमुळे ग्रामस्थांना दिलासा
Advertisement
मालवण : मालवण तालुक्यातील कोळंब गावच्या टेंबवाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जलस्रोतांमध्ये खारे पाणी असल्याने अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या ग्रामस्थांना बोअरवेलच्या उभारणीमुळे दिलासा मिळाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या माध्यमातून ही बोअरवेल उभारण्यात आली.

कोळंब टेंबवाडी परिसरातील जलस्रोतांमध्ये क्षारयुक्त पाणी असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पाण्याची ही समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता सामंत यांनी बोअरवेल उभारणीसाठी पुढाकार घेतला. या प्रयत्नांमुळे टेंबवाडीतील नागरिकांना पिण्यासाठी गोड्या पाण्याची उपलब्धता झाली असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement

ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न टेंबवाडीकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. बोअरवेलच्या उभारणीमुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, स्वप्निल परब, शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके, चैतन्य लोके, सिद्धी लोके, सुशांत भोजने, राजू हडकर, प्रसाद डीचोलकर, रेहान भोजने, आदित्य आचरेकर, गणेश पेडणेकर, अजय लोके, प्रदीप भोजने, भटा फाटक, मंगेश लोके, महेश फाटक, सचिन नरे, नामदेव नरे, पुरुषोत्तम भोजने, सुधीर पेडणेकर, बाबू धुरी, रवींद्र जेठे, सुशांत लाड, प्रथमेश लाड, विजय भोजने, भास्कर कवटकर, राणी आचरेकर, सरिता हडकर, नंदा हडकर, मंदा हडकर, दीपा फाटक, सुमन भोजने, संगीता भोजने, निकिता भोजने, उर्मिला भोजने, शिवम भोजने, शिवम फणसेकर, तन्मय नरे, मिताली फाटक, सीमा फाटक, उत्तम हडकर, रेखा पेडणेकर, सुचिता पेडणेकर आणि भाई ढोलम यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

ग्रामस्थांकडून आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांचे आभार

टेंबवाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. नागरिकांच्या मूलभूत गरजांची दखल घेऊन बोअरवेलची उभारणी करून दिल्याबद्दल शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचे आभार मानले.

Advertisement
Tags :

.