कोळंब स्मशानभूमीचा अंधार दूर; लोकप्रतिनिधींनी स्वखर्चातून बसविले सौरदिवे; विजय नेमळेकर, निलीमा परुळेकर यांचा पुढाकार
01:29 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कोळंब : कोळंब येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या अंधाराच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. ग्रामपंचायत कोळंबचे उपसरपंच विजय नेमळेकर आणि सर्जेकोटच्या सरपंच निलीमा परुळेकर यांनी स्वखर्चातून दोन सौरदिवे उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.
कोळंब स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यास पुरेशा प्रकाशाअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या किनारपट्टी मार्गावरही प्रकाशाची व्यवस्था नव्हती. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही समस्या कायम होती.
Advertisement
ग्रामस्थांची ही गैरसोय लक्षात घेऊन विजय नेमळेकर आणि निलीमा परुळेकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून दोन सौरदिवे बसवून दिले. त्यामुळे स्मशानभूमी परिसरासह किनारपट्टी मार्गावरही प्रकाशाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
सार्वजनिक सुविधांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतःहून पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याबद्दल दोघांचेही विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement
