For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकाटेंची अटक टळली

06:28 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोकाटेंची अटक टळली
Advertisement

उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा : शिक्षा कायम, जामीन मंजूर

Advertisement

मुंबई /नाशिक : प्रतिनिधी

कमी दरात सदनिका मिळविण्यासाठी कागदपत्रात फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने  शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. परंतु 1 लाख ऊपयांच्या जातमुचलक्याचा कोकाटे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने कायम ठेवली.

Advertisement

दरम्यान कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले होते. या अपीलवर न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. यावेळी कोकाटे याच्यावतीने अॅड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती केली. खंडपिठाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला. मात्र अपील दाखल करून घेताना 1 लाख ऊपयांच्या जातमुचलक्याचा जामीन मंजूर केला.

तरी शिक्षेला स्थगिती नाही

उच्च न्यायालयाने जामीन दिला असला तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही, हा तांत्रिक मुद्दा कोकाटे यांच्यासाठी मोठी अडचण ठरणार आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा सुनावण्यात आली, तर त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

एकच रेशन कार्ड, तरीही 2 घरे लाटली

हयाचिकाकर्त्यांचे वकील अॅड. मनोज मोहिते यांनी म्हटले, अल्प उत्पन्न गटातील गरजूंच्या घरांच्या लाटण्याचा प्रकार झाला आहे आणि त्यांनी एकट्यानी हे केलं नाही तर यांचा भाऊदेखील आहे. तेव्हा ते सभापती होते आणि वकील देखील होते. त्यांना कायदा माहीत नाही असं नाही. ते राजकारणात होते, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर हस्तक्षेप याचिकेची प्रत आम्हाला मिळाली नसल्याची कोकाटेंच्या वकिलांची माहिती कोर्टात दिली. दोन्ही एकाच कुटुंबातील सदस्य असताना 2 घरे घेतली. त्यांच्या वडिलांकडे 25 एकरांची जमीन होती, असा युक्तीवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे. तर या संदर्भात कोर्टाने त्यासंदर्भातील पुराव्यांची मागणी केली आहे.

तुमची शेतजमीन होती का

वडिलांची 25 एकरांची जमीन आहे, तुम्ही नाकारलं का नाही, शेत जमीन होती की नाही, अशी विचारणा कोकाटेंच्या वकिलांना केली आहे. मात्र शेतजमिनीतून येणाऱ्या उत्पन्नाचा तुम्ही उल्लेख केलेला नाही. त्यावेळच्या अथॉरिटीचादेखील निष्काळजीपणा होता. तुमच्या अर्जात आणि प्रतिज्ञापत्रात समानता आढळून येत नाही, याबाबतची विचारणादेखील कोर्टाने कोकाटेंना केली आहे. मुख्य सरकारी वकील मनकूवर देशमुख राज्य सरकारची बाजू मांडत आहेत. वीकर सेक्शनसाठी असलेल्या घरांचा गैरव्यवहार करणे दुर्दैवी असल्याचं सरकारी पक्ष म्हटलं आहे. राज्य सरकाराने वेळ मागितला. मात्र वेळ देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

याचिकाकर्ते आजच सर्वोच्च न्यायालयात जाणार

माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आजच जाणार आहेत. माणिकराव कोकाटे दोषी आहेत. त्यामुळं त्यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकडे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात आजच जाणार आहेत. माणिकराव कोकाटे दोषी आहेत. त्यामुळं त्यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

विधिमंडळ निर्णय घेणार

दरम्यान, माणिकराव कोकाटेंबाबत हायकोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं कोकाटेंची आमदारकी राहणार की जाणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लीलावती रुग्णालयात अँजिओग्राफी

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात अँजिओग्राफी करण्यात आली. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्यामुळे कोकाटेंवर अतिदक्षता विभागमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच  कोकाटेंना जर बायपास सर्जरी करायची नसेल तर त्यांना अँजिओप्लास्टी करावी लागणार असल्याचंही डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. तसेच अँजिओग्राफी असो वा अँजिओप्लास्टी या दोन्ही शस्त्रक्रियेनंतर पेशंटला सात दिवस रुग्णालयात राहावेच लागते,अशी माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार,कोकाटेंना पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असून त्यांना कोणताही ताण येऊ नये,असा सल्ला दिला आहे.

Advertisement
Tags :

.