For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kokan Rain Update : कोकणला पावसाने झोडपले, विलवडे रेल्वे मार्गावर दरड कोसळली

11:40 AM May 21, 2025 IST | Snehal Patil
kokan rain update   कोकणला पावसाने झोडपले  विलवडे रेल्वे मार्गावर दरड कोसळली
Advertisement

सुमारे दीड तास वाहतूक ठप्प, पहिल्या मान्सूनपूर्वचा दणका

Advertisement

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावासाने मंगळवारी दुपारी जिल्ह्यातत जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडला. अचानक धो-धो पावसाच्या आगमनाने साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली. अगदी सायंकाळपर्यंत या पावसाची जोरदार बॅटींग सुरू होती.

यात गुहागरातील भातगाव गोळेवाडीत घरावर वीज कोसळून घरातील इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झाले. तर चिपळूण शहरातील शंकरवाडी परिसरात घरावर वीज पडून 2 लाख 44 हजार रुपयांचे नुकसान झाले. राजापूर, लांजा, संगमेश्वर, दापोलीसह खेडलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ठिकठिकाणी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. 

Advertisement

मान्सूनपूर्व पडलेल्या या धुंवाधार पावसाने कोकण रेल्वे वाहतुकीला दणका दिला. लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वेस्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने रेल्वेची सेवा सुमारे तास ते दीड तास ठप्प झाली होती. पहिल्याच मान्सूनपूर्वचा पावसाने कोकण रेल्वे वाहतुकीला दणका दिला.

लांजा तालुक्यातील विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने रेल्वेची सेवा सुमारे तास ते दीड तास ठप्प झाली होती. मात्र तातडीने रेल्वे प्रशासनाला उपाययोजना करून मार्गावर आलेले दगड बाजूला करण्यात सायंकाळी उशिरा यश आले. त्यानंतर या रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पावसामुळे कोकण रेल्वेमार्गावर सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विलवडे येथे लगतच्या दरडीचा भाग टॅकवर कोसळला. भले मोठे दगड ट्रॅकवर आल्याने वाहतूक ठप्प झाली. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने रेल्वे प्रशासनाने या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्याही ठिकठिकाणी रोखून धरल्या होत्या.

मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस वैभववाडीत तर तेजस एक्स्प्रेसही कणवकवलीत थांबवण्यात आली होती. तर गोव्याच्या देशेने जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस रत्नागिरीत थांबवून ठेवण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा तातडीने दगड कोसळलेल्या ठिकाणी पाठवण्यात आली.

तेथे टॅकवर पडलेला दगड हटविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. सुमारे तासाभराने जेसीबीच्या सहाय्याने टॅकवरील दगड बाजूला सारण्यात आले. त्यानंतर ट्रॅक रेल्वे वाहतुकीला योग्य असल्याची तपासणी सुरू होती. त्या तपासणीनंतर सुमारे तासाभराच्या अवधीने रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या.

Advertisement
Tags :

.