महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोजिमाशि पतपेढीची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू; 17 जागांसाठी निवडणूक

05:36 PM Dec 07, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

सांगरूळ /वार्ताहर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी पतपेढी मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवार दिनांक ४ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून १७ जागांसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे . जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक मिलिंद ओतारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आाहेत .

Advertisement

कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या पतपेढीचे मतदानास पात्र सभासद संख्या १८२० आहे .सर्वाधिक मतदान करवीर ( ८१० ) असून शाहूवाडी (२६०) पन्हाळा (२६०) कागल (२१० ) हातकणंगले (११० ) गगनबावडा ( १०० ) भुदरगड (२५) शिरोळ ( १५ ) गडहिंग्लज (१० ) आजारा (५ ) चंदगड (५)असे इतर तालुक्यातील मतदान आहे.

Advertisement

निवडून द्यावयाच्या जागा सर्वसाधारण प्रतिनिधी १२ जागा ,अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी १ जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती अथवा विशेष मागासवर्ग प्रतिनिधी १ जागा ,इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १ जागा ,महिला प्रतिनिधी २ जागा अशा एकूण १७ जागासाठी ही निवडणूक होत आहे .

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर असून उमेदवारी अर्जाची छाननी ११ डिसेंबर २०२३ दुपारी बारा वाजता निवडणूक कार्यालयात होणार आहे .१२ डिसेंबर रोजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून १२ डिसेंबर ते २६ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे . उमेदवारांना चिन्ह वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन २७ डिसेंबर २०२३असून मतदान ७ जानेवारी २०२४ रोजी होणार असून मतमोजणी त्याच दिवशी मतदानानंतर अर्ध्या तासाने केली जाणार असून मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे . सध्या या संस्थेवर शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील वसंतराव देशमुख बापूसाहेब शिंदे के के पाटील उदय पाटील व्ही जी पोवार, संजयसिंह कलिकत्ते, आर एस मर्दाने यांच्या नेतृत्वाखालील सुकाणू समितीची सत्ताआहे . अडचणीत असलेल्या संस्थेला पाच वर्षात काटकसरीचा कारभार करत संस्थेच्या ठेवी व कर्ज वाटपात वाढ करत व्यवसाय वृद्धी केली असून संस्थेला आर्थिक स्थैैर्य प्राप्त करून दिले असल्याच्या मुद्द्यावर सर्व गटांनी सहकार्य केल्यास सत्तारूढ गट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आसून .तडजोड न झाल्यास संस्थेच्या प्रगतीच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका या गटाची आहे. विरोधी शिक्षक नेते दादासाहेब लाड तसेच पतपेढीचे माजी चेअरमन विलास साठे यांनीही स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

गुरुवार दिनांक ७ डिसेंबर अखेर सर्वसाधारण गटातून (५९ )
महिला गटातून (६ )
अनुसूचित जाती जमाती गटातून (१० )
इतर मागासवर्गीय गटातून (१३ )
भटक्या जाती व जमाती गटातून ( ७ )

असे एकूण ९४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अद्याप एक दिवस आहे .
बहुतांशी सभासदांच्यातून निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा असून निवडणुकीमुळे पडणारा संस्थेवरील आर्थिक खर्चाचा बोजा टाळण्यासाठी सर्व गटाचे नेते एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करणार का ? तसेच निवडणूक लागणार याचे चित्र माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे

Advertisement
Tags :
Credit Bank five-year electionFive Year ElectionKojimashi Electiontarun bharat news
Next Article