For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शतकी खेळीसह कोहलीच्या वनडेत 15000 धावा पूर्ण

06:32 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
शतकी खेळीसह कोहलीच्या वनडेत 15000 धावा पूर्ण
Advertisement

भारतीय संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ फलंदाज विराट कोहलीने रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या विडींजविरूद्धच्या वनडे सामन्यात माजी जागतिक दर्जाचा फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 15 हजार धावांचा टप्पा तसेच 55 शतकांची विक्रमी मजल मारली आहे.

Advertisement

विराटने या सामन्यातील 29 व्या षटकात अल्झारी जोसेफच्या चेंडूवर चौकार ठोकून 48 चेंडूत 63 धावा जमवित 15 हजार धावांचा टप्पा गाठला. या सामन्यापूर्वी विराटला हा टप्पा गाठण्यासाठी 59 धावांची जरूरी होती. वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पा गाठणारा सचिननंतर विराट कोहली हा दुसरा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने 15 हजार धावांचा टप्पा 377 डावामध्ये तर कोहलीने हा टप्पा 303 डावात गाठला. कोहलीने 15,950 चेंडूत हा टप्पा गाठत सचिनला मागे टाकले.  सचिनने 17,528 चेंडूत हा टप्पा गाठला होता.

विराटचे वनडे क्रेकेटमध्ये हे 55 वे शतक असून तो असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 463 सामने व 452 डावात 49 शतके आणि 96 अर्धशतकांसह 18,426 धावा जमविल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.