For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी कोडोली ग्रामपंचायत कोरडा दिवस पाळणार

06:34 PM Dec 05, 2023 IST | Kalyani Amanagi
साथीचे रोग नियंत्रणात आणण्यासाठी  कोडोली ग्रामपंचायत  कोरडा दिवस पाळणार
Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

Advertisement

वेगाने पसरत चाललेले चिकन गुनिया व डेंग्यू सारखे साथीचे रोग नियंत्रणात आणणे साठी कोडोली ता. पन्हाळा ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.सरपंच भारती पाटील, उपसरपंच प्रवीण जाधव व ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण यांच्या सहीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात परिसर स्वच्छ ठेवण्याचे व जुनाट टायरीची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन सर्व ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

कोडोलीत गेली चार महिने चिकनगुनिया व डेंगू सारखे साथीच्या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ह्या साथीच्या रोगाचा फैलाव रोखणेसाठी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आठवड्यातून एक दिवस संपूर्ण गावाचा दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद करणार असून त्या दिवशी सर्व नागरिकांनी घरातील सर्व पाणी साठावण्याची भांडी, पाण्याची टाकी, ब्यारेल आशा वस्तू रिकाम्या करून त्या पूर्ण सुकवून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नोटीसी द्वारे करण्यात आले आहे.

Advertisement

आशा सेविका व आरोग्य विभाग यांच्या मार्फत प्रत्येक घरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरु केली असून नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करू लागले आहेत. तसेच सर्व टायर व पंक्चर दुकानदार यांना जुन्या टायरी याचा योग्य विल्हेवाट लावावीत व असे नं केलेस दुकानावर साथी रोग नियंत्रक कायद्या अंतर्गत कारवाई करणार असल्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण गावातून औषध फवारणी आशा विविध योजना रबवल्या जाऊ लागल्या आहेत तरी सर्व नागरिकांनी कोरडा दिवस पाळून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात आले आहे.

गटारातील पाण्याचा निचरा होण्याची गरज

कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने गरारीची स्वच्छता अभियान सुरू आहे परंतु ज्या भागात गटारीत पाणी साठून राहते आशा ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आरोग्य उपकेंद्र वाढवण्याची गरज

साथीचे रोग नियत्रंणासाठी प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उपाय योजना करण्यात येतात कोडोली हे पन्नास हजारांहून अधिक लोकसंखेच्या गाव केखले प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येते या ठिकाणी अमृतनगर उपकेंद्र जागे अभावी कोडोलीत कार्यरत आहे पाच हजार लोकसंखेला एक आरोग्य उपकेंद्र या अनुषंगाने कोडोलीत सुमारे नऊ उपकेंद्राची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाल्यास तिथे अधिकारी कर्मचारी उपलब्द झाल्यास आरोग्य समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

Advertisement
Tags :

.