महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांना सेवा देणारे कोडार सरकारी कृषी फार्म

12:59 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काजूच्या 13 प्रजातींच्या सुमारे 15000 कलमांची निर्मिती, आंब्याच्या 12 प्रजातींच्या सुमारे 8000 कलमांची निर्मिती 

Advertisement

महेश गावकर /फोंडा

Advertisement

पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी व होतकरू शेतकऱ्यांना वृक्षरोपणासाठी झाडे उपलब्ध करण्यासाठी सुमारे वर्षभर कलमे बांधणे, रोपाची निगा राखणे, बदलत्या हवामानापासून सुरक्षा प्रदान करणे. उत्तमोत्तम कलमे निर्माण करण्यासाठी (मदर प्लांन्ट) मातृवृक्षाची लागवडीसह रोपनिर्मितीची प्रकिया फोंडा तालुक्यातील बेतोडा निरंकाल पंचायत क्षेत्रात कोडार सरकारी कृषी फार्ममध्ये हजारो रोपांची निर्मिती करून शेतकरी, बागायतदारांना सेवा देण्यात येत आहे.

कोडार येथील सरकारी कृषी फार्ममध्ये मातृवृक्षाची लागवड व संगोपन वेगवेगळ्या जातीच्या फळाझाडांची रोपनिर्मितीवर भर देण्यात येत आहे. सुमारे 110 हेक्टरच्या विर्स्तीण जागेत हे सरकारी कृषी फार्म विस्तारलेले आहे. फोंडा येथील विभागीय कृषी कार्यालयात फेंडा तालुक्यातील सुमारे 3634 कृषी कार्डधारक शेतकरी नोंदणीकृत आहेत. कृषी कार्डधारकांना योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात तर इतरांना मूळ रकमेत कलमे एप्रिल ते जूनपर्यंत कोडार कृषी फार्मात उपलब्ध असतात.

110 हेक्टरच्या जागेत काजू, आंब्याच्या मातृवृक्षाची लागवड 

कोडार फार्ममध्ये सध्या एकूण लागवाडीच्या क्षेत्राअंतर्गत बारामाही पीक 56.65 हेक्टर तर हंगामी पिकासाठी 1.58 हेक्टर बागायत क्षेत्रातील लागवडीयोग्य पडीक जमिन सुमारे 20.55 हेक्टर आहे. अकृषक पडीक जमीन 27.33 हेक्टर आहे. सरकारी कृषी फार्ममध्ये एकूण 35 कर्मचारी कार्यरत आहे. बागकाम करणारे माली दिवसाकाठी सुमारे 100-150 कलमे बांधून तयार करतात. हंगामानुसार त्याची लागवड करण्यात येते. सध्या काजूची कलमे बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर जुलै महिन्यात आंब्याची कलमे तयार करण्यात येईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ती पिशवीत ऊजविण्यात येतात. त्यानंतर ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतात.

कोडार कृषी फार्मात काजूच्या कलमाच्या 13 प्रजाती उपलब्ध 

कोडार कृषी फार्मचे अधीक्षक अडोल्फो राजेश डिकॉस्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कृषी फार्ममध्ये काजूच्या सुमारे 13 प्रजातींची कलमे तयार केली जातात. कलमे तयार करतानाही आधुनिकतेवर भर दिला जातो. सध्या चर्चेंत असलेली वेंगुर्ला-4 (व्ही-4) व्ही-7 अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे. तिसवाडी-3,बाळळी-2 या काजूच्या प्रजातीच्या मातृवृक्षाची लागवड करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त कर्नाटक येथील नेत्रा जम्बोची काजूच्या मातृवृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे. प्रति किलो 100 काजूंच्या बिया देणाऱ्या कलमाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्याशिवाय विविध प्रजातीचे आंब्याची कलमे, पेरू, चिकू, नारळ, पोफळी, मसाल्याची कलमे यांचा समावेश आहे. काजूच्या कलमे शेतकऱ्यांसाठी नियमितपणे वर्षानुवर्षे मिळत राहण्यासाठी (मदर प्लांट) मातृवृक्षाची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी पॉलीहाऊसची निर्मिती करून सुरक्षित ठेवण्यात येत असल्याची माहिती डिकॉस्ता यांनी दिली. प्रत्येक वर्षी काजूची सुमारे 15000 कलमे, आंब्याची अंदाजे 8000 कलमे त्याशिवाय पेरूची एकंदरीत 3000 कलमे निर्मिती करण्यात येत आहे.

होम शेड गार्डनसाठी कलमे पुरविण्यासाठी थेट विक्री बंद 

साधारण एप्रिल महिन्यापासून कलमाची खरेदीविक्रीला प्रारंभ होत असतो. शेतकरी मान्सूनपूर्वी सज्ज असल्यामूळे एप्रिल ते जूनपर्यंत शेतकरी कलमांची खरेदी करीत असतात. त्यानंतर विक्री मंदावते उरलेली सर्व कलमे ‘होम शेड गार्डन’ या योजनेखाली मंत्री, आमदार उचलत असतात. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना, मतदारांसाठी उपलब्ध करतात.अशी माहिती कोडार कृषी फार्मचे कृषी अधिकारी पांडुरंग देसाई यांनी दिली.

आंब्याची कोय फेकू नका, कोडार फार्ममध्ये आणून द्या!

आंब्याची कलमे बांधण्यासाठी आंबा खाल्यानंतर राहिलेली कोयी संकलन करणे महत्वाचे आहे. कोडार फार्ममध्ये या कोयी 50 पैसे प्रति कोय या दराने घेतल्या जातात. तसेच रूजलेले आंब्याचे रोपटे दीड रूपये प्रति रोप असा दर दिला जातो. शेतकऱ्यांनी व बेरोजगारांनी याचा लाभ उठवत स्वयंरोजगारातून अर्थार्जन करावे,असे आवाहन येथील फार्म अधिकारी पांडुरंग देसाई यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article