For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ॲट्रॉसिटी कायद्याबाबत माहिती जाणून घ्यावी

04:57 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
ॲट्रॉसिटी कायद्याबाबत माहिती जाणून घ्यावी
Advertisement

सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डौर यांचे साळेल व चौके येथे प्रतिपादन

Advertisement

चौके वार्ताहर -
सोशल माध्यमांमधुन अँट्रासिटी कायदयाबाबत वेगवेगळया पोस्ट किंवा मॅसेज फिरत असतात. त्यामुळे या कायदयामध्ये काही बदल झाला आहे का अशी शंका नागरिकांच्या मनामध्ये येते. परंतु , अशा प्रकारच्या संदेशांवर विश्वास ठेवु नका. ॲट्रॉसिटी कायदयामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. ॲट्रॉसिटी कायदा हा संवेदनशील व सक्षम असा कायदा आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायदयाबद्दल नागरिकांनी माहिती जाणुन घ्यावी असे प्रतिपादन नागरी हक्क संरक्षक पथक प -मुख सहायक पोलीस निरीक्षक संजय डौर यांनी साळेल व चौके येथील कार्यक्रमात बोलताना केले.

या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. चव्हाण, साळेल सरपंच रविंद्र साळकर, उपसरपंच लक्ष्मण परब, ग्रा. प. सदस्य अश्विनी जाधव, सिद्धी परब, पोलीस पाटील रविंद्र गावडे, गणेश गावडे, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर, विजय चौकेकर, ग्रा. प. सदस्य अनिशा चौकेकर, अॅड. अशोक चौकेकर, स्वप्नील चौकेकर, दादु चौकेकर, नामदेव चौकेकर, संग्राम कासले तसेच साळेल व चौके सम्यनगर येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

Advertisement

यावेळी बोलताना सहायक पोलीस निरीक्षक संजय डौर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हयात १९९० ते २०२३ या कालावधीत ॲट्रॉसिटीच्या १४५ केसेस दाखल झाल्या आहेत. यामधील ३३ केसेसची सुनावणी प्रक्रीया पुर्ण झाली आहे. परंतु यापैकी फक्त ५ गुन्ह्यामध्ये दोष सिद्धी झाली आहे. म्हणजेच दोष सिद्धीचे प्रमाण १.५ टक्के एवढे आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल संपुर्ण माहिती जाणुन घेणे आवश्यक आहे. तरच आपल्याला कायद्यातील तरतुदी समजतील. अनुसुचित जाती जमातीच्या नागरिकांच्यावर होणा-या अन्यायाला प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. या कायद्याची प रिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी कायद्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Advertisement
Tags :

.