For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून चाकू हल्ला; एकजण गंभीर जखमी

06:47 PM May 04, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून चाकू हल्ला  एकजण गंभीर जखमी
Advertisement

                           सावळज येथे किरकोळ कारणावरून चाकू हल्ला

Advertisement

तासगाव : तासगांव तालुक्यातील सावळज येथे किरकोळ कारणावरून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर दोघे चाकू लागून किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून चार सज्ञान व एक अल्पवयीन अशा एकूण पाच जणांविरूध्द तासगांव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पाचही जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिली. याप्रकरणी सावळज येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुमित शाम सावळजकर, सनि शाम सावळजकर, शाम बाबु सावळजकर, रोहन कांबळे (पूर्ण नाव माहित नाही) व १७वर्षीय एक अल्पवयीन अशा पाच जणा विरूध्द फिर्याद दिली आहे.

Advertisement

१ मे रोजी रात्री फिर्यादी व त्यांचे मित्र प्रतिक बुधावले, श्रेयश बुधवाले असे सावळज येथील उमाजी नाईक चौक येथे गप्पा मारत होते. त्यावेळी फिर्यादी यास प्रतिक बुधावलेने सांगितले की, मी कुत्तर फाटा येथून मोटारसायकलवरून राजे उमाजी नाईक चौकाकडे येत असताना मला सुमित सावळजकर यांनी त्याच्याकडील मोटारसायकलने जोराचा कट मारला. त्यावेळी आमच्यादोघात वादा-वादी झाली त्यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, फिर्यादी त्यांचे मित्र बसलेल्या ठिकाणी राजे उमाजी नाईक चौक येथे रात्री सुमित सावळजकर, सनि सावळजकर हे दोघे मोटारसायकलवरून आले. त्यांचे पाठीमागे शाम सावळजकर, रोहन कांबळे, व एक अल्पवयीन हे चालत आहे. सर्वजण प्रतिक बुधावले यास तुला मस्ती आली आहे, तुला चाकूने भोकसून ठार करतो.

तेवढ्यात सुमित सावळजकरने चाकू प्रतिकच्या पोटात दोन वेळा खुपसला. यावेळी फिर्यादी सोडवणेस गेला असता सनि सावळजकर याच्या हातातील चाकू त्याच्या उजव्या हाताच्या करंगळी व त्याच्या बाजूच्या बोटाला लागला. तर फिर्यादीचा मित्र श्रेयश बुधावले हा भांडण सोडवायला मध्ये आला असता शाम सावळजकरच्या हातातील चाकू श्रेयशच्या छातीला लागला.

तसेच रोहन कांबळे यांनी प्रतिक याचे दोन्ही हात पाठीमागे ओढुन धरले. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने प्रतिक यास लाथा-बुक्यांनी मारहाण केली तर सोडवायला गेले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी तिघांनाही मिरज सिव्हील येथे दाखल करण्यात आले असून प्रतिक याची तब्येत गंभीर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सर्वांना अटक केल्याची माहिती निरीक्षक विशाल टकले यांनी दिली.

Advertisement
Tags :

.