For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | सांगलीत किरकोळ कारणावरून थरार! गाडी धुण्यासाठी पाणी दिले नाही म्हणून माय-लेकावर चाकूने हल्ला

12:35 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   सांगलीत किरकोळ कारणावरून थरार  गाडी धुण्यासाठी पाणी दिले नाही म्हणून माय लेकावर चाकूने हल्ला
Advertisement

Advertisement

सांगली : वाहन धुण्यास पाणी न-दिल्याचा राग मनात धरुन तिघांनी माय लेकास शिवीगाळ करुन चाकू हल्ला केल्याचा प्रकार घडला.याप्रकरणी स्वप्नील गौतम बनसोडे (वय ३५, रा. हनुमाननगर गल्ली, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामाबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडला.या घटनेची माहिती अशी, फिर्यादी स्वप्नील हे सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील कट्टा फोडत होते.

त्यावेळी त्यांची आई संगीता या घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत होती. त्या दरम्यान संशयित सोहेल तांबोळी उर्फ टोल्या आणि त्याचे दोघे साथीदार तेथे आले. त्यांनी संगीता यांच्याशी, वाहन धुण्यासाठी पाणी मागितले असता ते का दिले नाही या कारणावरुन वाद घालण्यास सुरवात केली.

Advertisement

फिर्यादी स्वप्नील याने संशयितांना, तुम्ही गेटच्या आतमध्ये का आला ?
असा जाब त्यांना विचारला. याचा राग आल्याने संशयितांनी माय लेकांना शिवीगाळ करुन दोघांवर चाकूने हल्ला केला.यामध्ये दोघेही जखमी झाले. यानंतर संशयित तिघेही घटनास्थळावरुन पसार झाले. पोलिसांनी तिघाही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Tags :

.