For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूर महापालिका मतदानासाठी केएमटी बस फेऱ्यांत कपात

02:59 PM Jan 14, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूर महापालिका मतदानासाठी केएमटी बस फेऱ्यांत कपात
Advertisement

                               मतदान प्रक्रियेसाठी केएमटी बसचा वापर

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर १४ व १५ रोजी केएमटीच्या बस फेऱ्यात कपात करण्यात आली आहे. अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी होणारी गैरसुविधा लक्षात घेवून केएमटीला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या परिवहन उपक्रममार्फत करण्यात आले आहे.

महापालिकेसाठी उद्या १५ रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रीयेसाठी मतदान साहित्य व कर्मचारी यांना मतदान केंद्रावर पोहचवणे, परत आणणे या कामासाठी केएमटीच्या बसचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आज बुधवार १४ रोजी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत आणि गुरुवार १५ रोजी दूपारी २ वाजल्यानंतर सर्वच मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.