केएमसी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. बाबासो उलपे
कोल्हापूर प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या (केएमसी कॉलेज) प्राचार्यपदी डॉ. बाबासो निवृत्ती उलपे यांची नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी (दि. 27) पदाचा कार्यभार स्वीकारला. डॉ. उलपे गेली 34 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून शारीरिक शिक्षक ते प्राचार्यपद असा त्यांचा प्रवास झाला आहे. डॉ. उलपे शारीरिक शिक्षणात कबड्डी या विषयावर पीएच.डी. केली आहे. ते पीएच.डी.चे मार्गदर्शक असून यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये तज्ञ व्याख्याते म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ते महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी सदस्य असून कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेच्या कार्यकारी मंडळावर आहेत. कबड्डीचे राष्ट्रीय पंच म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचा अनुभव आहे. ते महावीर महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम करत होते.
चार वर्षांनी मिळाला कायमस्वरूपी प्राचार्य
केएमसी कॉलेजला तब्बल साडेतीन चार वर्षांनी कायमस्वरूपी प्राचार्य डॉ. उलपे यांच्या रूपाने लाभला आहे. 2019 मध्ये डॉ. गवळी प्राचार्य होते. ते निवृत्त झाल्यानंतर प्रभारी प्राचार्यांकडे सूत्रे होती.