For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेटे स्पर्धेत केएलएस विजेता, डीपीला दुहेरी मुकुट

10:03 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
टेटे स्पर्धेत केएलएस विजेता  डीपीला दुहेरी मुकुट
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व तात्यासाहेब मुसळे स्कूल आयोजित टिळकवाडी क्लस्टर माध्यमिक टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या विभागात केएलएस संघाने गोमटेश संघाचा 2-0 तर मुलींच्या विभागात डीपी स्कूलने बालिका आदर्शचा 2-0 असा पराभव करून विजेतेपदासह तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर एसकेई कन्नडा स्कूल आयोजित प्राथमिक टेटे स्पर्धेत डीपीने बालिका आदर्शचा तर प्लेझंट कॉन्व्हेंटने एसकेई कन्नडाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

Advertisement

बालिका आदर्श स्कूलच्या सभागृहात आयोजित या टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन तात्यासाहेब मुसळे स्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा कवडी, स्पर्धा सचिव अनुराधा जाधव व बालिका आदर्श स्कूलचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मंजुनाथ गोल्याहळी, सिल्विया डिलिमा, उमेश मजुकर, उमेश बेळगुंदकर आदी मान्यवरांच्या हस्ते टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक विभागाच्या अंतिम सामन्या मुलींच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू डीपीच्या तनुष्का काळभैरवने बालिका आदर्शच्या प्राची मुचंडीकरचा 11-6, 11-2 तर दुसऱ्या सामन्यात शिवाली पुजारीने योगेश्वरी सायनाकचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

माध्यमिक विभागातील मुलींच्या विभागात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात बालिका आदर्शने गोमटेशचा 2-0 असा पराभव केला. पहिल्या एकेरीत सोनाली काकतकरने गोमटेशने साक्षी करमेचा 11-2,11-4 असा तर दुसऱ्या एकेरीत श्रद्धा चिरमुरेंनी कार्तिकी कार्वेचा 11-6,11-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत डीपी संघाने बालिका आदर्शचा 2-0 असा पराभव केला. पहिल्या एकेरीत सान्वी मांडेकरने बालिका आदर्शच्या सोनाली काकतकरच्या 11-7, 11-6 अशा तर दुसऱ्या एकेरीत आयुषी गोडसेने ऋतुजाचा 11-3, 11-2 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळविले.

Advertisement

सान्वी मांडेकर, आयुषी गोडसे, समीक्षा पुजारी, अलिंबा अत्तार यांची या खेळाडूंची तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मुलांच्या विभागात अंतिम सामन्यात केएलएसने गोमटेशचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या एकेरीत आदित्य धारवाडकरने गोमटेशच्या विनय भावीकट्टीचा 11-9, 11-8 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या एकेरीत श्रेयश इनामदारने प्रथमेश नलवडेचा 11-8, 11-6 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. केएलएस संघसुद्धा तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मजुकर, उमेश बेळगुंदकर, सिल्विया डिलिमा यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.