केएलएस, एमव्हीएम, जोसेफ संतिबस्तवाड अ-ब विजयी
बेळगाव : पोलाईट वर्ल्ड वाईड संघटना व सेंट पॉल्स स्कूल आयोजित 57 व्या फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात एम. व्ही. एम., केएलएस तर निशा छाब्रिया चषक स्पर्धेत सेंट जोसेफ संतिबस्तवाड अ व ब संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला.पहिल्या सामन्यात केएलएसने भातकांडेचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 10 व्या मिनिटाला प्रणव लाडच्या पासवर दक्ष मन्नोळकरने पहिला गोल केला. 12 व्या मिनिटाला अनिकेत पाटीलच्या पासवर प्रणव लाडने दुसरा गोल केला.
17 व्या मिनिटाला फिरोज पठाणच्या पासवर अनिकेत पाटीलने तिसरा तर 32 व्या मिनिटाला दक्ष मन्नोळकरच्या पासवर फिरोज पठाणने चौथा गोल केला. दुसऱ्या सामन्यात एम. व्ही. एम. स्कूलने मराठी विद्यानिकेतनचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात एम. व्ही. एम.च्या आर्यन व सार्थक यांनी प्रत्येकी दोन तर अनिकेतने एक गोल केला. निशा छाब्रिया चषक मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संतिबस्तवाड सेंट जोसेफ ऑफेन्स ब संघाने अंगडी संघाचा 2-0 असा पराभव केला. जोसेफतर्फे शशीकला व उमाश्री यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात संतिबस्तवाड सेंट जोसेफ ऑफेन्स अ संघाने मराठी विद्यानिकेतनचा 6-0 असा पराभव केला.
बुधवारचे सामने
- सेंट झेवियर्स वि. ज्ञान प्रबोधन दु. 12 वा.,
- केएलएस वि. संत मीरा दु. 1.30 वा.,
- हेरवाडकर वि. ज्योती सेंट्रल दु. 3 वा.,
- सेंट पॉल्स वि. एमव्हीएम सायं. 4.30 वा.
मुलींचे सामने
- संत मीरा वि. सेंट जोसेफ संतिबस्तवाड दु. 3 वा.
- झेवियर्स वि. डीपी सायं. 4.30 वा.