केएलएस, इंडस अल्तम स्कूल विजयी
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित 25 व्या हनुमान चषक 11 वर्षाखालील मुलांच्या आंतर शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात के एल एस इंग्लिश मीडियम स्कूल आणि इंडस अल्तम इंटरनॅशनल स्कूल संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला. यावेळी विजेत्या संघातील वेदांत दूधानी आणि हरिप्रसाद सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
संक्षिप्त धावफलक
सेंट झेवियर्स स्कूल -20 षटकात, 9 बाद, 87 धावा. (इंदर प्रजापत 12, विश्रुत व अर्णव प्रत्येकी 11 धावा केल्या. के एल एस संघातर्फे वेदांत दुधानी 3, असते सिद्धार्थ 2 सुब्रमण्यम व श्रीनिवास प्रत्येकी 1 बळी घेतले) के एल एस इंग्लिश मीडियम स्कूल-9.3 षटकात, 2 बाद, 88 धावा.(वेदांत दुधानी 59 धावा केल्या. सेंट झेवियर्स स्कूल संघातर्फे इंदर प्रजापत 2 बळी घेतला) के एल ई स्कूल अंकली-20 षटकात, 7 बाद, 173 धावा (हरिप्रसाद 49, पृथ्वीराज 36, गणेश कुमार 33 धावा. इंडस अल्तम स्कूल संघातर्फे आर्यन खोत 3, स्वयम् व ध्रुव प्रत्येकी 1 बळी घेतले.) इंडस अल्तम स्कूल-20 षटकात,9 बाद, 122 धावा. (सिद्धार्थ हेडा 37, अमोल 25, स्वयंम चव्हाण 11 धावा. के एल ई स्कूल संघातर्फे दक्ष,विनय व विवेकानंद यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले)