महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात जायंट्सच्या प्रशिक्षकपदी क्लिंगर

06:36 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गुजरात जायंट्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी मायकेल क्लिंगरची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाची रॅचेल हेन्स ही गुजरात जायंट्सची प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होती.

Advertisement

दुसरी महिलांची प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा 23 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ही स्पर्धा नवी दिल्ली आणि बेंगळूर येथे होईल. या स्पर्धेत एकूण 5 संघांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळविले होते. तर गुजरात जायंट्स उपविजेता ठरला होता. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 25 फेब्रुवारीला बेंगळूरमध्ये होईल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article