महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएलई, झेवियर्स, संत मीरा, जोसेफ उपांत्य फेरीत

09:31 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दीपा रेडेकर स्मृती चषक आंतरशालेय मुलींची फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स अकादमी आयोजित दीपा रेडेकर स्मृती चषक सेवन-ए-साईड आंतरशालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत केएलईने सेंट जोसेफचा, सेंट झेवियर्सने संतमीरा ब चा, संतमीरा अ ने सेंट झेवियर्स ब चा, सेंट जोसेफने केपीएससी खानापूरचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. सक्षम स्पोर्ट्स एरेना लोटस काऊंटी, टिळकवाडी येथील टर्फ मैदानावरती या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जोतिबा रेडेकर, विजय रेडेकर, प्रगती रेडेकर, अमित रेडेकर, संकल्प मोहीते, रश्मी मोहीते, वर्षा पाटील, वरुण पाटील, आदिती रेडेकर, सुरज मजुकर, निखिल कांबळे, ओमकार कुंडेकर, शुभम यादव, विवेक सनदी व अमरदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. चेंडू लाथाडून व दीपा रेडेकर यांना श्रद्धांजली वाहून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्स अ ने डीपी संघाचा 4-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे वसुंधराने 2, सहीदा व श्रावणी यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात झेवियर्स ब ने मराठी विद्यानिकेतनचा 2-1 असा पराभव केला.

Advertisement

मृणाल व प्रिती यांनी झेवियर्सतर्फे गोल केले तर विद्या निकेतनतर्फे एकताने 1 गोल केला. तिसऱ्या सामन्यात केएलईला केपीएससी खानापूर संघाने टायब्रेकरमध्ये 2-1 असा पराभव केला. केएलईतर्फे साची पुजारीने गोल केला तर खानापूरतर्फे होलवा बसनट्टीने गोल केला. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत केएलई संघाने सेंट जोसेफ अ चा 5-0 असा पराभव केला. केएलईतर्फे झोया मुल्लाने 3, रिया वाळकेने 2 गोल केले. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत सेंटझेवियर्स अ ने संतमीरा ब चा 3-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे वसुंधराने 2 तर श्रावणीने 1 गोल केला. तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात संतमीरा अ ने झेवियर्स ब चा 1-0 असा निसटता पराभव केला. संतमीरातर्फे चित्राने गोल केला. चौथ्याउपांत्यपूर्व सामन्यात सेंट जोसेफ ब ने केपीएस यु. खानापूर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. जोसेफतर्फे जैनब शेखने गोल केला. मंगळनवारी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत. सामन्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article