For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओष्ठविदरणग्रस्त मुलांच्या पोषणासाठी केएलई स्माईल ट्रेनचा पुढाकार

10:29 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओष्ठविदरणग्रस्त मुलांच्या पोषणासाठी केएलई स्माईल ट्रेनचा पुढाकार
Advertisement

बेळगाव : राष्ट्रीय पोषण महिनानिमित्त ओष्ठविदरण (फाटलेले ओठ) असलेल्या मुलांच्या आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी केएलई स्माईल ट्रेन व काहेरच्या न्यूट्रिशन अॅण्ड डायटेटिक्स विभागातर्फे पोषण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. केएलई एमआरसीच्या प्लास्टिक अॅण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाला ओष्ठविदरण असलेली 70 मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. मुलांच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये संतुलित आहार, आवश्यक पोषकतत्त्वे आणि नियमित व्यायामाचे महत्त्व तज्ञांनी समजावून सांगितले. जेएनएमसीचे प्राचार्य डॉ. राजेश पवार यांनी केएलई स्माईल ट्रेनने आतापर्यंत 10 हजार शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती दिली.

Advertisement

मुलांच्या उपचार प्रक्रियेत योग्य पोषणाचे महत्त्व स्पष्ट

डॉ. दर्शन रजपूत यांनी ओष्ठविदरण असलेल्या मुलांच्या उपचार प्रक्रियेत योग्य पोषणाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. माधव प्रभू यांनी मुलांच्या पालकांचे कौतुक करत ओष्ठविदरणासाठी आवश्यक असलेल्या सर्वसमावेशक उपचार व काळजीबद्दल विभागाचे अभिनंदन केले. डॉ. शुक्रानी शिंदे व डॉ. विनुथा देशपांडे यांनी मुलांच्या शारीरिक वाढीसाठी योग्य आहारासोबतच नियमित व्यायामाची गरज स्पष्ट केली. यावेळी मान्यवर, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.