For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलई इंटरनॅशनल, हेरवाडकरची बाजी

10:36 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
केएलई इंटरनॅशनल  हेरवाडकरची बाजी
Advertisement

हनुमान चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केएलई इंटरनॅशनलने ज्योती सेंट्रलचा 8 गड्यांनी तर एम. व्ही. हेरवाडकरने डॉफीडल स्कूल कुडची संघाचा 13 धावांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. श्रीपूर्ण कुलकर्णी व कनिष्क बेनिकट्टी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एस.के.ई. प्लटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम फलंदाजी करताना 15.4 षटकांत सर्वगडी बाद 52 धावा केल्या. पार्थ जाधवने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. केएलईतर्फे शशांक पोळने 7 धावात 2, कौस्तुभ पाटीलने 10 धावांत 2 तर स्वयंम खोत, पार्थ पाच्छापूर, इशान तिळवे, श्रीराम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलई इंटरनॅशनलने 6.2 षटकांत 2 गडीबाद 53 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. कनिष्क बेनिकट्टीने 1 षटकार, 3 चौकारांसह 23 धावा केल्या. ज्योतीतर्फे अंश चव्हाण व पार्थ पाच्छापूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी बाद 108 धावा केल्या. श्रीपूर्ण कुलकर्णीने 5 चौकारांसह 44, अनिष गवालीने 2 चौकारांसह 17, नैतिक लाटुकरने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. कुडचीतर्फे अमन नदाफने 12 धावांत 3 तर हर्षा गुरुद्वारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना डॉफिडल कुडचीने 20 षटकांत 9 गडी बाद 95 धावा केल्या. उमर मुजावरने 2 चौकारांसह 26, हर्ष गुरुद्वारने 3 चौकारांसह 18, रफान हजरतभाईने 10 धावा केल्या. हेरवाडकरतर्फे रचित गावडेने 25 धावांत 3, श्रीपूर्ण कुलकर्णीने 17 धावांत 3 गडी बाद केले.

Advertisement

गुरुवारचे सामने

  • लिटल स्कॉलर वि. जुनेद स्कूल कुडची सकाळी 9 वा.
  • केएलएस वि. एम. व्ही. हेरवाडकर दुपारी 1 वा.
Advertisement
Tags :

.