महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केएल राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर

03:37 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फिटनेस टेस्टमध्ये अपयशी : कर्नाटकच्या देवदत्त पडिक्कलची वर्णी लागण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट, बेंगळूर

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यात 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने स्टार फलंदाज के एल राहुल तिसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. के एल राहुलऐवजी आता कर्नाटकच्या देवदत्त पडिक्कलला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता आहे. केएल राहुलने पहिली कसोटीत शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले होते. या कसोटीदरम्यान राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. यानंतर तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. दोनच दिवसांपूर्वी बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला होता. राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीनंतर पुनरागमन करत असल्याचे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले होते. पण त्यांना फिटनेस सिद्ध केला तरच प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळेल अशी अट घालण्यात आली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल फिटनेस टेस्ट पास करु शकला नाही. फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे पुढील आठवडाभर राहुलला किमान आठवडाभर निरीक्षणाखाली राहावे लागेल. यानंतरच तो चौथ्या कसोटीत खेळू शकेल की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. दिग्गज फलंदाज विराट कोहली, श्रेयस अय्यर पाठोपाठ केएल राहुलही बाहेर पडल्याने टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, केएल राहुलच्या जागी बीसीसीआयने कर्नाटकचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कला संघात स्थान दिले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये देवदत्तचा फॉर्म शानदार राहिला असून याचाच फायदा त्याला झाला आहे. प्लेइंंग 11 मध्ये पडिक्कलला स्थान मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राजकोटमध्ये फिरकीची जादू चालणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरी लढत ही राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणर आहे. हा सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अशातच पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा बरोबरीनंतर तिसऱ्या सामन्यात देखील टीम इंडिया विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकोटमध्ये फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल अशी खेळपट्टी केली जाऊ शकते. रविंद्र जडेजाचे हे घरचे मैदान असून आर अश्विनचेही या मैदानावर रेकॉर्ड चांगले आहे. यामुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडेल की फिरकी गोलंदाज येथे विकेट्स घेतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article