केएल राहुलचा कर्नाटक रणजी संघात समावेश
वृत्तसंस्था / बेंगळूर
भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलचा 29 जानेवारीपासून मोहाली येथे पंजाबविरुद्ध सुरू होणाऱ्या 2025-26 रणजी करंडक क्रिकेट सामन्यासाठी कर्नाटक संघात समावेश करण्यात आला आहे.
राहुलच्या समावेशाने कर्नाटक संघाची ताकद वाढणार आहे तर संघाचे नेतृत्व देवदत्त पडिक्कलकडे सोपविण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचाही संघात समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांचा वेगवान गोलंदाजीचा मारा आणखी मजबूत झाला आहे. कर्नाटकाच्या मधल्या फळीसाठी एक मोठा धक्का म्हणजे अनुभवी फलंदाज करुण नायर दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. राहुलने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा लाल चेंडूचा सामना खेळला होता.
मध्यप्रदेशाकडून 217 धावांनी मोठ्या पराभवानंतर कर्नाटक आता एका अत्यंत आवश्यक विजयाच्या शोधात आहे. कर्नाटकने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सौराष्ट्र आणि गोव्याविरुद्धच्या अनिर्णीत सामन्यांनी आपल्या रणजी करंडक मोहिमेची सुरूवात केली होती. त्यानंतर कर्नाटकने केरळ आणि चंदीगडला हरवून हंगामाला सुरूवात केली तर महाराष्ट्रविरुद्धचा एक सामना अनिर्णीत राखला. संघ आता पुनगरागमन करुन पंजाबविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
कर्नाटक संघ : मयांक अगरवाल, केएल राहुल, अनिश केव्ही, देवदत्त पडिक्कल (कर्णधार), स्मरण आर., श्रेयस गोपाल, कृतिक कृष्णा, व्यंकटेश एम., विद्याधर पाटील, विद्वथ कविरप्पा, प्रसिद्ध एम. कृष्णा, मोहसीन खान, शिखर शेट्टी, श्रीजित केएल आणि ध्रुव प्रभाकर.