For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपर ओव्हरच्या थरारात केकेआरचा रोमांचक विजय

06:55 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुपर ओव्हरच्या थरारात  केकेआरचा रोमांचक विजय
Advertisement

लखनौ सुपर जायंट्सला पराभवाचा धक्का :  सामनावीर रिंकू सिंगची शानदार खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

आयपीएल 2026 च्या पहिल्या सुपर ओव्हर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून एक रोमांचक विजय नोंदवला. एकाना स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, लखनौनेही 20 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा करत सामना ‘टाय’ केला. मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना बरोबरीत आणला. सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनने कोलकातासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत लखनौला केवळ 1 धावेवर रोखले आणि दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात, रिंकू सिंगने कोलकातासाठी चौकार मारून विजय निश्चित केला.

Advertisement

प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरची सुरूवात खूप खराब झाली. टीम सेफर्ट शून्यावर तर अजिंक्य रहाणे 10 धावांवर बाद झाला. यानंतर अंगक्रिश रघुवंशीला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्डमुळे बाद देण्यात आले. यानंतर कॅमरुन ग्रीनने 51 चेंडूत 3 षटकारांसह 34 धावांची खेळी केली. स्फोटक फलंदाज रिंकूने 51 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांसह 83 धावांची खेळी केली. रिंकूने अखेरच्या षटकात सलग 4 षटकार खेचत केकेआरला 20 षटकांत 7 बाद 155 धावांपर्यंत पोहोचवले.

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर मिचेल मार्श 2 धावांवर बाद झाला. यानंतर एडन मार्करम व रिषभ पंत यांनी अर्धशतकी भागीदारी साकारत संघाचा डाव सावरला. मार्करम 31 धावा करत बाद झाला तर रिषभ पंत सर्वाधिक 42 धावांची खेळी करत माघारी परतला. निकोलस पूरन 9 धावांवर बाद झाल्याने त्याचा खराब फॉर्म पुन्हा दिसून आला. जॉर्ज लिंडे 2 चौकार मारून 8 धावा करत बाद झाला. इतर फलंदाजांनी निराशा केल्याने केकेआर हा सामना गमावणार अशी चिन्हे होती. पण, मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सामना बरोबरीत आणला. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि रोमांचक सुपर ओव्हरमध्ये केकेआरने बाजी मारत हा सामना जिंकला.

संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 7 बाद 155 : रिंकू सिंग 51 चेंडूत नाबाद 83, कॅमेरॉन ग्रीन 21 चेंडूत 34, अजिंक्य रहाणे 15 चेंडूत 10, रघुवंशी 9, रमणदीप सिंग 6, अवांतर 8. मोहसिन खान 5-23, जॉर्ज लिन्डे 1-18, दिग्वेश राठी 0-46, शमी 0-34.

लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 8 बाद    155 : रिषभ पंत 38 चेंडूत 45, मार्करम 27 चेंडूत 31, आयुष बदोनी 19 चेंडूत 24, हिम्मत सिंग 10 चेंडूत 19, मोहम्मद शमी 6 चेंडूत नाबाद 11, अवांतर 8. वैभव अरोरा 2-24, वरुण चक्रवर्ती 2-33, अनुकूल रॉय 1-19, ग्रीन 12d12, सुनील नरेन 1-23, कार्तिक त्यागी 1-41.

सुपर ओव्हर : लखनौ 2 बाद 1, सुनील नरेन 2-1, केकेआर बिनबाद 4.

सुपर ओव्हरचा थरार

  1. लखनौकडून निकोलस पूरन आणि एडन मार्करम फलंदाजीसाठी आले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने गोलंदाजी सुनील नरेनकडे सोपवली.

पहिल्याच चेंडूवर पूरन त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला.

  1. पंतने एक धाव काढली. त्यानंतर मार्करमने स्ट्राईक घेतली.

तिसऱ्या चेंडूवर मार्करमने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि पॉवेल टिपलेला झेल रिंकू सिंगने पूर्ण केला.

  1. सुपर ओव्हरमध्ये लखनौच्या फलंदाजांना फक्त 1 धाव काढता आली, त्यामुळे केकेआरसमोर दोन धावांचे लक्ष्य राहिले.
  2. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये कोलकाता फलंदाजीसाठी आले असता कर्णधार रिषभ पंतने चेंडू प्रिन्स यादवकडे सोपवला.
  3. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर एक शानदार चौकार मारून केकेआरचा विजय निश्चित केला.

-टाय होऊन सुपरओव्हरपर्यंत लांबलेला या मोसमातील पहिला सामना

-मोहसिन खानच्या भेदक माऱ्यापुढे केकेआरच्या फलंदाजांचा संघर्ष

-क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल अंगक्रिश रघुवंशी वादग्रस्तरित्या बाद झाल्याने केकेआरच्या अडचणीत भर पडली.

-सुपरओव्हरमध्ये केकेआरच्या सुनील नरेनची भेदक गोलंदाजी ठरली निर्णायक

Advertisement
Tags :

.