For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केकेआरचा सलग दुसरा पराभव

06:58 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
केकेआरचा सलग दुसरा पराभव
Advertisement

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा 65 धावांनी विजय : सामनावीर नितीश कुमार रेड्डी ची अष्टपैलू खेळी 

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

सनरायझर्स हैदराबादने आपल्या दुसऱ्या सामन्यात अखेरीस विजयाचे खाते उघडले आहे. हैदराबादने ईडन गार्डन्सच्या मैदानावर केकेआरचा तब्बल 65 धावांनी पराभव केला. हैदराबादने दिलेल्या 227 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा संपूर्ण संघ 161 धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार इशान किशनच्या नेतृत्त्वाखाली हा संघाचा यंदाचा पहिला विजय आहे.

Advertisement

हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 226 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआरचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले आणि त्यांच्यावर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढवली. या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सने चांगली सुरुवात केली मात्र नंतर त्यांच्या विकेट गेल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे 8 धावा करुन बाद झाला. फिन एलन आणि अंगकृष रघुवंशी यांनी पॉवरप्लेमध्ये चांगली फटकेबाजी केली. फिन एलन 28 धावा करुन बाद झाला. यानंतर कॅमेरुन ग्रीनला 2 धावा करता आल्या. याशिवाय, रघुवंशीने देखील 52 धावांचे योगदान दिले. केकेआरचा उपकर्णधार रिंकू सिंग याने 35 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. सुनील नरेनने दोन षटकार मारत 12 धावा केल्या. मात्र, षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो इशान मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. केकेआरचा महागडा खेळाडू कॅमेरुन ग्रीन मात्र विचित्र पद्धतीने बाद झाला. तो दुसऱ्या मॅचमध्ये केवळ 2 धावा करुन धावबाद झाला. इतर फलंदाजानीही निराशा केल्याने केकेआरला 65 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हेड-अभिषेकची वादळी सुरुवात

केकेआरने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि हैदराबादने 226 धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्माच्या जोडीने संघाला वादळी सुरूवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्येच 82 धावा कुटल्या. हेड 46 धावा तर अभिषेक शर्मा 48 धावा करत बाद झाले. यानंतर इशान 14 धावांवर, अनिकेत वर्मा 1 धाव करत बाद झाले. त्यानंतर हेनरिक क्लासेन व नितीश रेड्डी यांनी 82 धावांची भागीदारी रचत संघाला 200 धावांच्या पलीकडे नेले. क्लासेनने 35 चेंजूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. तर नितीश रेड्डी ने 39 धावांचे योगदान दिले. यानंतर हर्ष दुबेने 2 चौकार लगावत संघाला संघाला 226 धावांचा आकडा गाठून दिला.

-एसआरएचचा पहिला विजय

-क्लासेनचे अर्धशतक, हेड-अभिषेकची फटकेबाजी

-केकेआरच्या मुझाराबानी, अंगकृश रघुवंशीचे प्रयत्न वाया

-रिंकू सिंगचे आयपीएलमध्ये सर्वाधिक 41 झेलांचा विक्रम

Advertisement
Tags :

.