For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीच्या धडक्यापुढे टिकून राहण्याचे आज ‘केकेआर’समोर आव्हान

06:54 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीच्या धडक्यापुढे टिकून राहण्याचे आज ‘केकेआर’समोर आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

‘आयपीएल’मधील आपले आव्हान पुनरुज्जीवित केलेल्या दिल्ली कॅपिटल्सची गाठ आज सोमवारी येथे होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सशी पडणार आहे. यावेळी केकेआरच्या गोलंदाजीतील कमजोरींचा फायदा उठवण्याचा आणि गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये जाण्याचा प्रयत्न दिल्ली करेल. मागील पाच सामन्यांमधील चार विजयांसह रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ हळूहळू त्यांची सारी समीकरणे जुळवून आणू लागला आहे

दुसरीकडे, गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील केकेआर संघाला मागील पाच सामन्यांमध्ये तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे आणि गोलंदाजीमध्ये त्यांना फटका बसलेला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी दिल्लीने घेतलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू जेक फ्रेझर-मॅकगर्कने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडविलेले आहे. या 22 वर्षीय पॉवर हिटरने पाच सामन्यांत 237.50 च्या स्ट्राइक रेटने 247 धावा केलेल्या आहेत. मॅकगर्क इडन गार्डन्सवर फलंदाजीला अनुकूल परिस्थितीचा निश्चितच लाभ उठवून पाहेल.

Advertisement

पण दिल्लीची फलंदाजी केवळ मॅकगर्कपुरतीच मर्यादित नाही, तर दक्षिण आफ्रिकेच्या स्टब्सनेही आपल्या अप्रतिम पॉवर हिटिंगने सर्वांना थक्क केले आहे. फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, स्टब्स आणि प्रत्येक सामन्यात वेगाने प्रगती करणारा पंत हे केकेआरच्या गोलंदाजीसाठी चिंतेचे विषय असतील. केकेआरने जखमी मिचेल स्टार्कच्या जागी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा याला संघात घेतले, परंतु तो खूप महाग ठरला. फिरकीपटू सुनील नरेन वगळता केकेआरच्या एकाही गोलंदाजाने प्रभाव पाडलेला नाही. आयपीएलचा सर्वांत महाग खेळाडू असलेल्या स्टार्कने सर्वात जास्त निराशा केली आहे.

दिल्लीच्या गोलंदाजीचा विचार करता कुलदीप यादवने डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलसह एक मजबूत फिरकी जोडी तयार केली आहे. तथापि, यजमान संघाच्या दृष्टीनेही काही सकारात्मक बाबी आहेत. त्यापैकी एक म्हणजे या मोसमात सुनील नरेनच्या फलंदाजीला आलेला जोर ही आहे. नरेन आणि फिल सॉल्ट यांनी भरपूर धावा जमविल्या आहेत. परंतु अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि रमणदीप सिंग या खेळाडूंनाही आणखी योगदान द्यावे लागेल. या सामन्यानंतर ‘केकेआर’ला मुंबई आणि लखनौचा सामना करावा लागणार आहे. त्यापूर्वी आज विजयाची नोंद करून स्वत:ला प्ले-ऑफच्या शर्यतीत ठेवण्यास ते उत्सुक असतील.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.