महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केकेआरचा आरसीबीला दे धक्का !

08:42 PM Apr 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरसीबीवर 21 धावांनी मात, सामनावीर चक्रवर्तीचे 3 बळी, जेसन रॉयचे अर्धशतक, कोहलीचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

जेसन रॉयचे वेगवान अर्धशतक आणि आघाडीच्या अन्य फलंदाजांनी केलेले उपयुक्त योगदान आणि वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, आंद्रे रसेल यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या आधारे कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमधील साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 21 धावांनी पराभव करीत तिसरा विजय नोंदवला. 27 धावांत 3 बळी टिपणारा स्पिनर वरुण चक्रवर्तीला सामनावीर पुरस्कार मिळाला.

केकेआरने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 5 बाद 200 धावा जमविल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 षटकांत 8 बाद 179 धावांपर्यंतच मजल मारता आली. हंगामी कर्णधार कोहलीने 37 चेंडूत 54 धावा जमवित अर्धशतकी खेळी केली. पण इतर फलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ मिळाली नाही. महिपाल लोमरोरने 18 चेंडूत 34 धावा फटकावत कोहलीसमवेत चौथ्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केली. महिपालने आपल्या खेळीत 3 षटकार, एक चौकार मारला. अन्य फलंदाजांत दिनेश कार्तिकने 18 चेंडूत 22, फॅफ डु प्लेसिसने 7 चेंडूत एक चौकार, 2 षटकारांसह 17, सुयश प्रभुदेसाईने 9 चेंडूत 10, डेव्हिड विलीने 10 चेंडूत नाबाद 11, विजयकुमार विशाखने 8 चेंडूत नाबाद 13 धावा फटकावल्या. वरुण चक्रवर्तीने 3 तर इम्पॅक्ट खेळाडू सुयश शर्माने 30 धावांत 2, रसेलने 29 धावांत 2 बळी मिळविले. सलग चार पराभवामुळे केकेआर संघाची आठव्या स्थानावर घसरण झाली होती. या विजयानंतर ते आता सातव्या स्थानी पोहोचले आहेत.

जेसन रॉयचे जलद अर्धशतक

या सामन्यात मात्र प्रथम फलंदाजी मिळाल्यावर त्यांच्या फलंदाजांनी सुधारित कामगिरी केली. जेसन रॉयने शानदार अर्धशतक नोंदवत 29 चेंडूत 56 धावा फटकावताना 5 षटकार व चार चौकार नोंदवले. त्याने नारायण जगदीशनच्या साथीने केकेआरला चांगली सलामी देत 9.2 षटकांत 83 धावांची भागीदारी केली. त्यांची ही या मोसमातील सर्वोत्तम सुरुवात आहे. जगदीशनने 29 चेंडूत 27 धावा जमविल्या. लंकेच्या हसरंगाने मात्र भेदक फिरकी मारा करीत केकेआरच्या फलंदाजांना मोकळीक दिली नव्हती. त्याने दोन अप्रतिम स्पेल टाकत 24 धावांत 2 बळी मिळविले.

हसरंगाच्या पहिल्या स्पेलमधील अप्रतिम माऱ्यामुळे विजयकुमार विशाखला केकेआरला दोन धक्के देता आले. त्याने जगदीशन व रॉय यांना बाद केले. रॉयने पॉवरप्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करीत 22 चेंडूतच अर्धशतक गाठले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. तो बाद झाल्यानंतर कर्णधार नितीश राणाने धावांचा ओघ कायम ठेवताना 5 व 19 धावांवर असताना मिळालेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठवित 48 धावांचे योगदान दिले. त्याने 21 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार मारले. केकेआरचा नवा हिरो रिंकू सिंगने अखेरच्या टप्प्यात दोन चौकार, 1 षटकार ठोकत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. रिंकूने 10 चेंडूत नाबाद 18 धावा फटकावल्या तर डेव्हिड वीसे 3 चेंडूत 12 धावांवर नाबाद राहिला. त्याने 2 षटकार मारले.

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात शाहबाज अहमदला जेसन रॉयने पहिल्या पाच चेंडूतच 4 षटकार ठोकत एकूण 25 धावा तडकावल्या. पॉवरप्लेअखेर केकेआरने बिनबाद 66 धावा जमविल्या. पॉवरप्लेची षटके संपल्यानंतर हसरंगाने हुशारीने गोलंदाजी करीत त्यांच्या धावगतीला थोडासा ब्रेक लावला. विजयकुमार विशाख व हर्षल पटेल यांनीही अचूक मारा करीत धावांचो ओघ रोखला होता. विशाखच्या उसळत्या चेंडूवर जगदीशन बाद झाला तर रॉय त्याच्या अप्रतिम यॉर्करवर त्रिफळाचीत झाला.

संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 5 बाद 200 : जेसन रॉय 29 चेंडूत 56, जगदीशन 29 चेंडूत 27, वेंकटेश अय्यर 26 चेंडूत 31, नितीश राणा 21 चेंडूत 48, रसेल 1, रिंकू सिंग 10 चेंडूत नाबाद 18, वीसे 3 चेंडूत नाबाद 12, अवांतर 7. गोलंदाजी : हसरंगा 2-24, विजयकुमार विशाख 2-41, सिराज 1-33.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकांत 8 बाद 179 : कोहली 37 चेंडूत 6 चौकारांसह 54, डु प्लेसिस 7 चेंडूत 17, महिपाल लोमरोर 18 चेंडूत 34, दिनेश कार्तिक 18 चेंडूत 22, सुयश प्रभुदेसाई 9 चेंडूत 10, विली 10 चेंडूत नाबाद 11, विजयकुमार विशाख 8 चेंडूत नाबाद 13, अवांतर 6. गोलंदाजी : वरुण चक्रवर्ती 3-27, सुयश शर्मा 2-30, आंद्रे रसेल 2-29.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article