जेम्स स्टीवर्टच्या बायोपिकमध्ये केजे अपा
न्युझीलंडचा लोकप्रिय अभिनेता जेके अपा हा दिवंगत अभिनेते जेम्स स्टीवर्ट यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहेत. दिग्गज अभिनेत्याच्या बायोपिकमध्ये तो मुख्य भूमिकेत असतील. ‘रिवरडेल’सारख्या सीरिजसाठी प्रसिद्ध केजे अपाने जेम्सचा बायोपिक स्वीकारला आहे.
बायोपिकमध्ये हॉलिवूडमधील जेम्स स्टीवर्टची कारकीर्द, ‘द फिलाडेल्फिया स्टोरीमध्ये अकॅडमी पुरस्कार जिंकणे आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान लढाऊ वैमानिक म्हणून अमेरिकेच्या सैन्यात भरती होण्यासारख्या गोष्टी दाखविण्यात येणार आहेत. जेम्स हे अभिनेते असण्यासह सैन्य एव्हिएटरही होते. त्यांच्या बायोपिकचे नाव ‘जिम्मी’ आहे. ‘जिम्मी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले. अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय अभिनेता, ज्याला लोकांचे प्रेम मिळाले असे या पोस्टरमध्ये नमूद आहे. चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल. मोठ्या पडद्यावर जेम्स स्टीवर्टची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल केजे अपाने आनंद व्यक्त केला आहे.
मी नेहमीच जेम्स स्टीवर्ट यांचा चाहता राहिला आहे. त्यांच्या कहाणीला जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सन्मानास्पद वाटत आहे. न्युझीलंडमधील असल्याने मी दीर्घकाळापासून देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावनेने जगलेल्या अमेरिकन पुरुषांच्या पिढीचा प्रशंसक राहिलो आहे, असे केजे अपाने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरोन बर्न्स करणार आहेत. जेम्स स्टीवर्ट यांची मुलगी केली स्टीवर्ट या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या असतील. 1997 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी जेम्स स्टीवर्ट यांचे निधन झाले होते.