For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कित्तूर पोलिसांकडून तत्परतेने खुनाचा छडा

06:56 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कित्तूर पोलिसांकडून तत्परतेने खुनाचा छडा
Advertisement

मृतदेह : मयताच्या पत्नी-मुलासह मारेकऱ्यांना अटक

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

हिरेनंदीहळ्ळी क्रॉस (ता. कित्तूर) जवळ आठ दिवसांपूर्वी खून झालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. कित्तूर पोलिसांनी या खुनाचा छडा लावला असून त्याची पत्नी व मुलांनीच अन्य दोघा जणांच्या मदतीने मिळकत हडपण्यासाठी खून केल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी बुधवारी पत्रकारांना या घटनेसंबंधी माहिती दिली आहे.

Advertisement

शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कित्तूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुमारे 30 ते 35 वर्षीय अनोळखीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मक्याच्या शेतात आढळून आला होता. यासंबंधी चंद्रशेखर बसाप्पा हनमनाळ, राहणार हिरेनंदीहळ्ळी यांनी फिर्याद दिली होती.

मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे ओळख पटविणेही कठीण जात होते. कित्तूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. शेतवडीत आढळलेला मृतदेह हिरेनंदीहळ्ळी येथील कलमेश शंकऱ्याप्पा कोटी (वय 45) याचा असल्याचे समजताच त्याचा खून कोणी केला? याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. हिरेनंदीहळ्ळी येथील महेश अंबण्णावर व मुदकाप्पा कोळेकर यांची नावे चर्चेत होती. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली.

खून झालेल्या कलमेशची पत्नी कस्तुरी कलमेश कोटी (वय 42), मुलगा किरण कलमेश कोटी (वय 25), महेश मडिवाळप्पा अंबण्णावर (वय 32), मुदकाप्पा पद्मराज कोळेकर (वय 30) या चौघा जणांना अटक करण्यात आली. कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक जी. जी. हंपन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

कलमेशची पत्नी कस्तुरी व मुलगा किरण सध्या कुंदगोळ तालुक्यातील तर्लघट्ट येथे राहतात. हिरेनंदीहळ्ळी येथील महेश अंबण्णावर व मुदकाप्पा कोळेकर यांच्याशी हातमिळवणी करून कलमेशच्या नावे असलेली मिळकत हडपण्यासाठी त्याचा खून करून मृतदेह हिरेनंदीहळ्ळी क्रॉसजवळील शेतवडीतील मक्याच्या पिकात टाकून दिल्याचे आढळून आले होते. तांत्रिक विभागाच्या मदतीने कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement
Tags :

.