For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कित्तूर उत्सवाला उत्साहात प्रारंभ

06:12 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
कित्तूर उत्सवाला उत्साहात प्रारंभ
Advertisement

किल्ला परिसराला विद्युत रोषणाई : वस्तू प्रदर्शन- फळ-पुष्प प्रदर्शनाचे आयोजन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

ब्रिटीशांविरुद्ध लढा देऊन विजय मिळविलेल्या कित्तूर राणी चन्नम्मांच्या विजयोत्सवाच्या स्मरणार्थ साजऱ्या करण्यात येणाऱ्या कित्तूर उत्सवाला शुक्रवार दि. 23 रोजी कित्तूर येथे उत्साहात प्रारंभ झाला.

Advertisement

राज्यभरातून संचार करून कित्तूर येथे दाखल झालेल्या वीरज्योतीचे कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राणी चन्नम्मा चौकात स्वागत केले. त्यानंतर कित्तूर संस्थानचे ध्वजारोहण करून उत्सवाचे उद्घाटन केले. लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी वीरराणी कित्तूर चन्नम्मांसह थोरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कलमठ मडिवाळ राजयोगिंद्र स्वामी, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन आदी उपस्थित होते.

कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने किल्ला परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आवारात वस्तू प्रदर्शन व फळ-पुष्प प्रदर्शन भरविण्यात आले असून कलमठचे मडिवाळ राजयोगिंद्र स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन उपस्थित होते. त्यानंतर विविध कलापथके व वाद्यपथकांचे संचलन झाले. उत्सवाच्या निमित्ताने कृषी, आरोग्य, बागायती यासह विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवार दि. 25 पर्यंत कित्तूर उत्सव चालणार आहे.

Advertisement
Tags :

.