महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किसान सन्मान निधी आज लाभार्थींना मिळणार

06:49 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर : अनेक विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. वाशिम, ठाणे आणि मुंबई येथे त्यांचे कार्यक्रम होणार असून पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता ते लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करणार आहेत. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान देशभरातील सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना जवळपास 20,000 कोटी ऊपयांचा पीएम-किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित करतील. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2,000 कोटी ऊपयांच्या पाचव्या हप्त्याचा शुभारंभ करतील.

पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी वाशिम येथे जगदंबा माता मंदिर, पोहरादेवी येथे दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्र्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी ऊपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी 4 वाजता पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी ऊपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता बीकेसी मेट्रो स्टेशनवरील कार्यक्रमाला उपस्थित राहून बीकेसी ते आरे जेव्हीएलआर, मुंबईकडे धावणाऱ्या मेट्रो टेनला हिरवा झेंडा दाखवतील. याप्रसंगी बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान ते मेट्रोमधून प्रवास करणार आहेत.

पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत 1,920 कोटी ऊपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान सुमारे 1,300 कोटी ऊपयांच्या एकत्रित उलाढालीसह 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्रार्पण करतील. तसेच जनावरांसाठी युनिफाइड जीनोमिक चिप आणि देशी लिंग-क्रमित वीर्य तंत्रज्ञान लाँच करतील. याव्यतिरिक्त मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क समर्पित करतील. कार्यक्रमादरम्यान ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article