हिसाब बराबर’मध्ये कीर्ति कुल्हारी
आर. माधवनसोबत झळकणार
‘हिसाब बराबर’ या चित्रपटातून अभिनेत्री कीर्ति कुल्हारी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आर. माधवन दिसून येणार आहे. अश्विनी धर यांच्याकडून दिग्दर्शित होणारा हा चित्रपट हास्य, व्यंग आणि भावनांचे मिश्रण सादर करणारा असेल. कॉर्पोरेट बॅकेच्या अब्जावधी डॉलर्सच्या घोटाळ्याला उघड करण्याच्या साहसी लढाईनंतर वित्तीय फसवणूक यासारख्या मुद्द्यांचा शूरपणे सामना करणाऱ्या व्यक्तींची कहाणी यात असेल.
हा विनोदी चित्रपट आहे, मला विनोदी अभिनय येत नाही असे लोकांना वाटते, परंतु चित्रपटाची कहाणी अत्यंत चांगली आहे. मी या चित्रपटावरुन अत्यंत उत्सुक असल्याचे कीर्तिने सांगितले आहे.
आर. माधवनचे काम अत्यंत चांगले आहे. ते समोरच्या कलाकारांना उत्साहित करतात. त्यांना स्वत:चे संवाद चांगल्याप्रकारे आठवत असतात. मी पहिल्यांदाच माधवन यांच्यासोबत काम केले आहे. पडद्यावर झळकण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला होता असे कीर्तिचे सांगणे आहे.या चित्रपटात आर. माधवन, कीर्ति कुल्हारी आणि नील नितिन मुकेश देखील दिसून येणार आहे. नील नितिन मुकेश यात शक्तिशाली बँकर, मिकी मेहताच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.