घटस्फोटाच्या 4 वर्षांनी कीर्ति पुन्हा प्रेमात
फोर मोअर शॉट्स फेम अभिनेत्याला करतेय डेट
प्राइम व्हिडिओचा शो ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ पाहिला असेल तर अभिनेत्री कीर्ति कुल्हारी आणि अभिनेता राजीव सिद्धार्थ यांना निश्चितच ओळखत असाल. या शोचा पहिला सीझन 2019 मध्ये आला होता आणि तेव्हापासून तो यशस्वी राहिला आहे. आतापर्यंत याचे 3 सीझन प्रदर्शित झाले आहेत. आता लवकरच चौथा सीझन प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान अभिनेत्री कीर्ति आणि राजीव सिद्धार्थ डेटिंग करत असल्याचे समोर आले आहे. कीर्ति आणि राजीवने रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केलेली नाही. कीर्तिने राजीवसोबतची छायाचित्रे शेअर केली आहेत. यात दोघेही एका कारमध्ये हात पकडून असल्याचे दिसून येते. याचबरोबर कीर्तिने आणखी एक छायाचित्र शेअर केले होते, ज्यात ती राजीवच्या खांद्यावर डोकं टेकून आराम करत असल्याचे दिसून आली होती. कीर्ति कुल्हारीने 4 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. कीर्ति पुन्हा प्रेमात पडली असल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. कीर्ति ही अभिनयनिपुण अभिनेत्री असल्याने तिच्या नव्या प्रोजेक्ट्सबद्दल नेहमीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते.