For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौघांना कीर्ती चक्र; 18 जणांना शौर्य चक्र

06:10 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
चौघांना कीर्ती चक्र  18 जणांना शौर्य चक्र
Advertisement

राष्ट्रपतींकडून 103 जणांना पुरस्कार जाहीर : 9 जणांचा मरणोत्तर सन्मान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांना 103 शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये 4 कीर्ती चक्र आणि 18 शौर्य चक्रांचा समावेश आहे. त्यापैकी 9 पुरस्कार मरणोत्तर आहेत. वायुसेनेच्या दोन शूर सैनिकांना शौर्य चक्र आणि 6 सैनिकांना वायु सेना पदक प्रदान करण्यात येणार आहे.

Advertisement

राष्ट्रपतींनी हवाई दलाचे विंग कमांडर व्हर्नन डेसमंड कीन व्हीएम यांना फ्लाइंग (पायलट) शौर्य चक्र जाहीर केले आहे. तर विंग कमांडर जसप्रीत सिंग संधू यांना वायुसेना पदक जाहीर झाले आहे. लष्करी जवानांना त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. कर्नल मनप्रीत सिंग (मरणोत्तर), मेजर मल्ला रामगोपाल नायडू, रायफलमन रवी कुमार (मरणोत्तर), पोलीस उपअधीक्षक हिमायून मुझम्मील भट (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र प्राप्त झाले आहे. तर कर्नल पवन सिंग यांच्यासह 18 जणांना शौर्य चक्र मिळाले आहे.

दिवंगत कर्नल मनप्रीत सिंग यांना कीर्ती चक्र

भारतीय लष्कराचे माजी कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले आहे. सप्टेंबर 2023 मध्ये काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्याला आपला जीव गमवावा लागला. रायफलमॅन रवी कुमार आणि मेजर एम नायडू यांनाही कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. चकमकीच्या वेळी कर्नल मनप्रीत सिंग 19 राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे नेतृत्व करत होते. त्यांचा आरआरचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी फक्त चार महिने उरले असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते. ते पंजाबमधील भरोंजियां गावचे रहिवासी होते.

हवाई दलात शौर्य चक्र प्राप्त दोन सैनिकांचा समावेश आहे. त्यामध्ये विंग कमांडर व्हर्नन डेसमंड केन व्हीएम यांचा समावेश असून ते सध्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये तैनात आहेत. 24 जुलै 2023 रोजी एक जग्वार फायटर जेटचा अपघात टाळण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती. तसेच एअरफोर्स स्टेशन हकिमपेट येथे तैनात असलेले स्क्वॉड्रन लीडर दीपक कुमार यांनाही शौर्य चक्र प्राप्त झाले आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी उ•ाण करताना विमानाला पक्ष्याचा धक्का बसल्यामुळे इंजिनला आग लागली. त्यांनी लगेचच जेट लँड करण्याचा निर्णय घेतला. रात्री मर्यादित सिग्नल असूनही त्यांनी आपल्या शहाणपणाचा वापर करून लहान धावपट्टीवर विमान उतरवले होते. वायु सेनेच्या जसप्रीत सिंग संधू, अक्षय अऊण महाले, आनंद विनायक आगाशे,  महिपालसिंग राठोड, विकास राघव, अश्वनी कुमार यांनाही पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Advertisement

.