For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिघडवणाऱ्या व्यवस्थेपासून आपल्या मुलांना वाचवा...इंदुरीकर महाराजांचे पालकांना आवाहन

06:44 PM Jan 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
बिघडवणाऱ्या व्यवस्थेपासून आपल्या मुलांना वाचवा   इंदुरीकर महाराजांचे पालकांना आवाहन
kirtanist Nivritti Indurikar Maharaj
Advertisement

प्रयाग चिखली वार्ताहर

पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमक आणि प्रचंड स्पर्धेच्या युगाच्या दुष्परिणामामुळे सध्याची पिढी बिघडत चालली आहे. तरी देखील वैयक्तिक पातळीवर आई वडील आपल्या मुलांना बिघडवणाऱ्या व्यवस्थेपासून वाचवू शकतात. त्याकरता आई-वडिलांनी अगदीच बारकाईने आणि तितक्या जबाबदारीने आपल्या पिढीकडे लक्ष देऊन त्यांना घडवणे ही काळाची गरज असल्याचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार व कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी वरणगे पाडळी येथील किर्तन सेवेच्या वेळी सांगितले याबाबत यावेळी उपस्थिताना हात जोडून विनंतीही केली.

Advertisement

वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील ह भ प मृदंगमनी यशवंत महाराज यांच्या मातोश्री वैकुंठ वासी सरस्वती पाटील याची प्रथम पुण्यतिथी तसेच आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या दिवंगत लोकांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाज प्रबोधनकार तसेच कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे प्रवचन तसेच बासरी वादन भजन पुण्यस्मरण निमित्त दीपोत्सव हरिनाम जप अशा विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

कीर्तनकार इंदुरीकर पुढे म्हणाले ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे संपत्ती धनदौलत जिथे असते तिथे दया पाहिजे तरच त्या ठिकाणी देव असतो. पापाचा पैसा माणसाला सुखाने जगून देत नाही. सुनबाई नी सासू सासरे यांना जवळ केले तर देशातील पाळणाघरे निश्चित बंद होतील. अहंकार सोडून दिला तरच आयुष्याचा उद्धार होईल. गावागावातील राजकारण एकदम खालच्या पातळीवर नेऊ नका. आपला डोळे - झाकपणा आपल्या मुलांच्या प्रगतीचा अडसर होईल. दारूमुळे कौटुंबिक भावनिक मानसिक आर्थिक नुकसान होते व्यसनापासून तरुण पिढीला वाचवण्याची जबाबदारी सर्व समाजाची आहे. पैसा मिळवा मात्र वेळ आली की विरक्त ही व्हा अशाप्रकारे ग्रामीण समाजाचे प्रबोधन साधण्याचा प्रयत्न कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केला.

Advertisement

दरम्यान यावेळी वरणगे पाडळी येथील डोक्यावरील डौलदार फेटा जतन करणारे बाळू गुरव, रघुनाथ गुरव, गणपती आंग्रे, महादेव बिरंजे पांडुरंग नाना पाटील पांडुरंग बाबू पाटील, दिनकर भाऊ पाटील,आनंदा धनगर, दरम्यान बासरी वादक अमोल राबाडी यांचे सुमधुर बासरी वादनाचा कार्यक्रम झाला यावेळी किरण शेटे- इंदुरीकर यांनी गायनाची साथ दिली.

Advertisement
Tags :

.