महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कर्स्टन, गिलेस्पी पाक संघाचे प्रशिक्षक

06:37 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचे प्रख्यात प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची पाक वनडे आणि टी-20 संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीची पाक कसोटी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पीसीबीने रविवारी केली आहे.

Advertisement

पीसीबीने पाकचा माजी अष्टपैलू अझहर मेहमूदची क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी पाक संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली असून त्याचा कालावधी दोन वर्षांचा राहिल. क्रिकेट प्रशिक्षक क्षेत्रामध्ये गॅरी कर्स्टन आणि जेसन गिलेस्पी यांची नावे अग्रस्थानावर आहेत. आता कर्स्टन आणि गिलेस्पी या विदेशी प्रशिक्षकांकडून पाक संघाला कितपत महत्त्व दिले जाईल हे सध्या भाकित करु शकणार नाही. पाकचा क्रिकेट संघ 22 मे रोजी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये पाक आणि इंग्लंड यांच्यात चार टी-20 सामने आयोजित केले आहेत. पाकचा इंग्लंड दौरा 22 मेपासून सुरु होणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये पाक संघाच्या होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गिलेस्पीकडे संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article