For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानात किरोडीलाल मीणांचा मंत्रिपदाचा राजीनामा

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानात किरोडीलाल मीणांचा मंत्रिपदाचा राजीनामा
Advertisement

वृत्तसंस्था /जयपूर

Advertisement

राजस्थानमधील भाजपच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले किरोडीलाल मीणा यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्वत:च्या मतदारसंघात तसेच प्रभाव असलेल्या भागातील कुठल्याही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला तर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा मीणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला यातील एका मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.

या पराभवानंतर मीणा यांनी राजीनाम्याचे संकेत दिले होते. दौसा मतदारसंघातील भाजपच्या पराभवानंतर विरोधी पक्षांनी देखील त्यांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर मीणा यांनी गुरुवारी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु त्यांचा हा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यावर 7-8 लोकसभा मतदारसंघांमधील प्रचाराची जबाबदारी सोपविली होती. दौस आणि टोंक-सवाई माधोपूर समवेत या मतदारसंघांमध्ये यापूर्वी देखील मी खूप काम केले आहे. तरीही पक्षाला विजय मिळवून देता न आल्याने नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मीणा यांनी सांगितले.मीणा हे पूर्व राजस्थानातील भाजपचे मातब्बर नेते आहेत. मीणा हे सध्या सवाई माधोपूरचे आमदार असून तेथून 5 व्यांदा विजयी झाले आहेत. यापूर्वी ते दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

Advertisement
Tags :

.