महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

'माफिया' मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन; किरीट सोमय्यांचे खळबळजणक ट्विट

07:56 PM Jul 07, 2022 IST | Abhijeet Khandekar

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये उध्दव ठाकरेंचा (Uddhav Thackeray)उल्लेख 'माफिया' असा केला आहे. त्यामुळे राज्यात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यानंतर शिंदे गट काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्विट केल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी देखील या संदर्भात भाष्य केलं आहे. ( Kirit Somaiya News)

Advertisement

सोमय्यांनी (Kirit Somaiya)माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, गेल्या सरकारच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ज्या पध्दतीन सरकारचा दुरुपयोग करत होते ही एक प्रकारची माफियागीरीचं होती. माझ्यावर २२ आरोप करण्यात आले. संजय राऊत रोज सकाळ- संध्याकाळ शिवराळ भाषेत बोलायचे. दीड दमडीचा भ्रष्टाचार केला नसताना माझ्या कुटुंबाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली. हिरामणी तिवारीचं मुडंण केलं.
मनसुख हिरेनची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. त्या हत्या करणाऱ्याला माफिया हाच शब्द वापरला पाहिजे असे ते म्हणाले.

हेही वाचा- Ratnagiri : जिल्ह्यात अतिवृष्टीसह वादळी वारे वाहण्याचा इशारा

काय म्हणाले ट्विटमध्ये सोमय्या
मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री यांना हाठविल्या बदल अभिनंदन केले.

हेही वाचा- गरज होती तेव्हा पक्ष सोबत नव्हता, अभिजीत अडसूळांची खंत

दिपक केसरकर काय म्हणाले

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जेष्ठ नेत्यांना किंवा पक्षप्रमुखांना अपशब्द वापरू नये असं आम्ही मुंबईमध्ये आल्यानंतर भाजपला आधिच सांगितलं होतं. यानुसार त्यांनी ही भाजप नेत्यांना तशा सूचना केल्या होत्या. किरीट सोमय्या हे भाजप नेते आहेत. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले आहे. अशा पध्दतीचे वक्तव्य केलेलं निश्चितचं आम्हाला आवडणार नाही. याबाबत फडणवीसच बोलतील असे केसरकर म्हणाले.

Advertisement
Tags :
#bjp#deepakkesarkar#devendrafadanvis#EknathShinde#Shivsena#udhhavthackeray
Advertisement
Next Article