महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किरण सिंहदेव छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्ष

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

छत्तीसगड भाजपने प्रदेशाध्यक्ष पदावर किरण सिंहदेव यांची वर्णी लावली आहे. किरण सिंहदेव हे बस्तरच्या जगदलपूरचे आमदार आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अऊण साव यांच्याकडे होती. राज्यात भाजपचे सरकार स्थापन होताच नव्या सरकारमध्ये अऊण साओ यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे आता प्रदेश कार्यकारिणीत बदल करण्यात आला आहे. सरचिटणीस पदांवरही काही नव्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. पक्षाने राजस्थानातील 199 पैकी 115, मध्यप्रदेशातील 230 पैकी 163 तर छत्तीसगडमध्ये 90 पैकी 54 स्थानांवर विजय मिळविला आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ही तिन्ही राज्ये काँग्रेसने जिंकली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article