For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किरण सामंत यांचा कोकणवासियांशी संवाद

11:45 AM Nov 14, 2024 IST | Radhika Patil
किरण सामंत यांचा कोकणवासियांशी संवाद
Kiran Samant's interaction with the people of Konkan
Advertisement

लांजा : 

Advertisement

महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सामंत हे राजापूर-लांजा-साखर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे असून गावागावात प्रचार सुरू आहे. त्यांनी मंगळवारी व्यवसायानिमित्त सांगली-सातारा-कराड येथे असणाऱ्या कोकणातील मतदारांशी संवाद साधला. किरण सामंत यांनी व्यवसायानिमित्त सांगली- सातारा-कराड या शहरांमध्ये असलेल्या मतदारांची कोकणवासीयांच्या स्नेहसंमेलनानिमित्त भेट घेतली.

यावेळी मोठ्या संख्येने कोकणवासीय उपस्थित होते. भेटीदरम्यान सामंत यांनी मतदारांशी चर्चा केली. राजापूर-लांजा-साखर विधानसभा मतदारसंघाची स्थिती आणि विकासाची रणनीती, याचा लेखाजोखा त्यांनी मतदारांसमोर ठेवला. राजापूर मतदारसंघातील परिवर्तनाच्या लाटेत सांगली सातारा-कराड येथे असणारे मतदारही सहभागी होतील, असा शब्द यावेळी देण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.