किरण जॉर्ज उपांत्यपूर्व फेरीत
06:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
इक्सन सिटी (कोरिया) : विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना चीन तैपेईच्या तृतिय मानांकित ची जेनचा तीन गेम्सच्या लढतीत पराभव केला. गुरुवारी खेळविण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 24 वर्षीय किरण जॉर्जने तृतिय मानांकित ची जेनचा 21-17, 19-21, 21-17 अशा गेम्समध्ये 75 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. आता किरण जॉर्जचा पुढील सामना जपानच्या तेकुमा ओबायाशीबरोबर होणार आहे.
Advertisement
Advertisement