For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किन्नर आखाड्याची नव्याने पुनर्रचना होणार

06:11 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
किन्नर आखाड्याची नव्याने पुनर्रचना होणार
Advertisement

ममता कुलकर्णी, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची हकालपट्टी : महाकुंभात मोठी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ .प्रयागराज

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याने एक मोठी कारवाई केली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून काढून टाकत त्यांची आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. यासोबतच, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर आणि आखाड्यातून काढून टाकण्यात आले आहे. आता किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळणार आहे. आखाड्याची नव्याने पुनर्रचना केली जाईल, असे ऋषी अजय दास यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात निवृत्तीची घोषणा केली होती. महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्यात ममता आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना भेटल्या होत्या. महाकुंभात संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णी यांना ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ असे नवीन आध्यात्मिक नाव देण्यात आले. यासोबतच त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले.

महामंडलेश्वर बनवल्यानंतर वाद

ममता कुलकर्णी यांच्या महामंडलेश्वरपदी नियुक्तीवरून बराच वाद झाला. त्यांच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्तीविरुद्ध संत सतत निषेध करत होते. बाबा रामदेव यांनी ममता महामंडलेश्वर करण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले होते.  कालपर्यंत सांसारिक सुखांमध्ये रमलेले काही लोक एकाच दिवसात संत झाले आहेत किंवा त्यांना महामंडलेश्वरसारख्या पदव्या मिळाल्या आहेत. किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनीही एका महिलेला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवणे हे तत्वांच्या विरुद्ध असल्याचे म्हटले होते.

Advertisement
Tags :

.