सावंतवाडीत “ज्ञानियांचा राजा -मोगरा फुलला” उत्साहात
सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्रचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक-संगीत कार्यक्रम बुधवार 25 मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बॅरिस्टर नाथ पै बहुउद्देशीय सभागृह , सावंतवाडी येथे पार पडला. या कार्यक्रमातील संगीत मैफिलीने सावंतवाडीकरांची मने जिंकली. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे ,गायक सन्मिता धापटे -शिंदे, पार्श्वगायक प्रतीक्षा डुडे , तबला अभिषेक पवार,संवादिनी स्वप्नील घाटोळे ,बासरी कीर्तेश बाविस्कर ,पखवाज विवेक शिळकर ,साईड रीदम नरेंद्र काळे कीबोर्ड प्रणव देशपांडे ,संयोजक सिद्धेश कुंटे यांनी कार्यक्रम यशस्वी केला .या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर , पत्रकार अभिमन्यू लोंढे, विनायक गावस , भाई देऊळकर आधी उपस्थित होते.